सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वसामान्य ग्रामस्थ व नागरिकांचे प्रश्न सोडवावे:- पत्रकार संभाजी शिंदे नेवासा
शासकीय योजना व शासकीय कामकाजाची सर्वसामान्य नागरिकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून दैनिक माहिती उपलब्ध व्हावी :-पत्रकार संभाजी शिंदे नेवासा.
प्रत्येक गावात ग्राम विकास अधिकारी व ग्रामस्थांच्या सहकार्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून असा व्हाट्सअप ग्रुप तयार व्हावा की ज्या मध्ये सर्व शासकीय कर्मचारी व ग्रामस्थ सहभागी असतील. यामध्ये ग्राम विकास अधिकारी,कामगार तलाठी , पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष व सर्व सदस्य, जिल्हा परिषद शाळेचे व हायस्कूलचे मुख्याध्यापक, कृषी सहाय्यक, पशुवैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक व कर्मचारी, सरपंच व सदस्य , अंगणवाडी कर्मचारी, इत्यादी सहभागी असतील.
या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना येणाऱ्या शासकीय योजना ,येणारा शासकीय निधी याबद्दल माहिती होईल .त्याचप्रमाणे तो निधी कसा आणि कुठे वापरला गेला याबद्दलही माहिती मिळेल.
व या अनुषंगाने सर्व शासकीय लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचतील. या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ना कुठल्या शुभेच्छा न कुठले इतर विषय असतील फक्त शासकीय कर्मचारी व त्यांच्या शी निगडीत प्रश्न असतील ते ग्रामस्थ या ग्रुपच्या माध्यमातून शेअर करतील.
त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या शासकीय अधिकाऱ्यांन पर्यंत पोहोचतील व त्यावर काय निर्णय घ्यायचा याबद्दल शासकीय अधिकारी योग्य प्रकारे ठरवतील.
सर्वसामान्य ग्रामस्थांना या माध्यमातून आपल्या समस्या मांडण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होईल.
शेतीचे कामकाज ,मजुरी यामुळे ग्रामसभेला सर्वजण हजर राहू शकत नाही ही गोष्ट लक्षात घेता सोशल मीडियाचा वापर करून सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी हा उपाय म्हणजे एक अमृततुल्य ठरू शकतो.