नेवासा पोलिसांची दमदार कारवाई. दहा मोटारसायकलीं सह दोन मोबाईल हस्तगत.
२८ फेब्रुवारी रोजी नेवासा पोलीस स्टेशन यांच्याकडे आलेल्या फिर्यादीनुसार राहुल संजय दाने नेवासा व अरुण तुकाराम डौले यांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध मोटरसायकल चोरीची फिर्याद नेवासा पोलीस स्टेशन यांच्याकडे दिलेली होती.
या अनुषंगाने रात्रीच्या वेळी गस्त घालत असणाऱ्या पोलीस अंमलदार यांनी संशयास्पद हालचालीचा आढावा घेत. ०१ मार्च २०२२ रात्रीच्या वेळी गाडीवरून फिरत असणाऱ्या ज्ञानेश्वर गणपत शेडुते. याला मोटरसायकलसह ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेली मोटरसायकल चोरीची असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. वरील नमूद केलेल्या फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनुसार सदर मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्ह्यातील आरोपीला पोलिस कस्टडी देऊन न्यायालयाने पोलीस रिमांड काढण्याचे आदेश दिले. पोलीस रिमांड मध्ये आरोपी पोपटासारखा बोलू लागला. व त्याच्या कडून मुख्य आरोपींची नावे समोर आले.१) ज्ञानेश्वर शांताराम मोरे रा. भोकर तालुका श्रीरामपूर (अटक)२) रामा रमेश पोटे रा. घोडेगाव तालुका नेवासा(फरार)३) लक्ष्मण दिलीप आहेर. रा .भोकर तालुका श्रीरामपूर (अटक) यांच्याकडून अनेक ठिकाणी मोटरसायकल चोरी केल्याबद्दल ची माहिती पोलिसांना मिळाली.
सदरील गुन्हेगारांकडून विविध कंपनीच्या १०मोटरसायकली
तसेच दोन चोरीचे मोबाईल असा एकूण ०३ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वरली गुन्ह्यातील तीन आरोपींकडून त्यांनी दिलेल्या कबुली जबाब नुसार त्यांनी चोरून नेलेल्या विविध ठिकाणांवरून चोरलेल्या मोटरसायकली खालील प्रमाणे आहेत.
१) एमआयडीसी वाळूज औरंगाबाद गुन्हा रजिस्टर नं१२१/२०२२ भा द वि ३७९ प्रमाणे
२) एमायडीसीवाळूज औरंगाबाद गुन्हा रजिस्टर नं१४२/२०२० भा द वि ३७९ प्रमाणे
४) रांजणगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे गुन्हा रजिस्टर नं १११/२०१८ भा द वि ३७९
५) सोनई पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नं१४२/२१९........
६) शनिशिंगणापूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नं६९/२०१९...........
७) शनिशिंगणापूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नं१३३/२०१९.......
८) नेवासा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नं १६५/२०२२....
९) नेवासा पोलीस स्टेशन (बेवारस मोटरसायकल)
१०) नेवासा पोलीस स्टेशन (बेवारस मोटर सायकल)
११) सोने पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नं७१/२०२२ भा द वि ३७९ प्रमाणे २ मोबाइल
अशाप्रकारे विविध ठिकाणी सदर गुन्ह्यातील सापडलेल्या साधनांची व मोबाईलची गुन्ह्याची नोंद आहे.
नेवासा पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारांची चांगलीच तंतरली आहे. नेवासा पोलीस प्रशासनाने चांदा येथे झालेल्या दरोड्याच्या घटनेनंतर नेवासा पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईचे जनतेकडून कौतुक करण्यात येत आहे. चांदा तालुका नेवासा येथे झालेल्या घातकी दरोड्या नंतर पोलिस यंत्रणा अतिशय सतर्क झाली असून त्यांनी केलेल्या कारवाईचे पडसाद नक्कीच इतर गुन्हेगारांवर पडतील. व गुन्हेगारी कारवायांना लगाम बसेल.