जीवनामध्ये ध्येय निश्चित करून मार्गक्रमण करावे. व्याख्याते अविनाशजी चाटे
जीवनामध्ये ध्येय निश्चितकरून मार्गक्रमण करावे अविनाशजी चाटे
आव्हाणे बु :-(प्रतिनिधी भारत भालेराव) प्रत्येकाला जर आपल्या आयुष्यात मोठे व्हायचे असेल तर आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित करून इच्छाशक्ती मेहनत कठोर परिश्रम याद्वारे ते साध्य करावे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते अविनाशजी चाटे यांनी केले,आबासाहेब काकडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेवगाव तसेच प्राथमिक विद्यामंदिर निर्मलनगर शेवगाव व कोटा एक्सलन्स सेंटर शेवगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कर्मयोगी आबासाहेब काकडे यांचा १०४ वा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा लक्ष्मणराव बिटाळ, प्रमुख अतिथी प्रसिद्ध व्याख्याते अविनाशजी चाटे,असिस्टंट कमांडंट गणेशजी पायघन,श्रीमती मंदाकिनी पुरनाळे,विद्यालयाचे प्राचार्य श्री संपतराव दसपुते, प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका श्रीम.परविन पटेल,कोटा एक्सलंट सेंटरचे प्रमुख हरीश खरड,बळवंत शिंदे गुरुजी,उपप्राचार्या रूपा खेडकर,उपमुख्याध्यापिका मंदाकिनी भालसिंग,पर्यवेक्षिका पुष्पलता गरुड ,पर्यवेक्षक सुनील आव्हाड, शिवाजी पोटभरे,मा.नगराध्यक्ष विनोद मोहिते,भायगावच्या सरपंच सौ मनीषा राजेंद्र आढाव,खुंटेफळचे सरपंच दिलीप सुपारे,उपसरपंच सर्जेराव काळे,खामगावचे सरपंच अरुण बडधे,उपसरपंच सुभाष बडधे आदी मान्यवर उपस्थित होते .
चाटे यांनी आपल्या मनोगतात पुढे म्हणाले की,आबासाहेबांनी समाजासाठी केलेले कार्य हे अत्यंत विलक्षण आहे.कोणत्याही व्यक्तीला संकटांना सामोरे गेल्याशिवाय यश मिळत नाही,अपयश आले तर हार मानू नका,एकमेकांशी तुलना न करता तसेच केवळ स्वप्न न पाहता ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत असे म्हणाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा लक्ष्मणराव बिटाळ आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,आपण समाजाचे काही देणे लागतो या उदात्त हेतूने आबासाहेबांनी विविध वसतिगृहे शाळा,महाविद्यालये, वकिली व्यवसाय या माध्यमातून समाजातील गोरगरीब कष्टकरी शेतकरी दीन दलीत अनाथ यांच्या उद्धारासाठी कार्य केले.आयुष्यभर कम्युनिष्ठ विचारसरणीशी ते एकनिष्ठ राहिले .
आबासाहेबांनंतर त्यांच्या विचारांचा वारसा त्यांचे सुपुत्र डॉ अँड.विद्याधरजी काकडे साहेब व सौ हर्षदाताई काकडे मोठ्या जोमाने पुढे चालवत आहेत.आबासाहेबांनी लावलेल्या शिक्षणरुपी रोपट्याचे आज मोठ्या वटवृक्षात रूपांतर झाले आहे.आबासाहेबांचा एखादा विचार तरी प्रत्येकाने आपल्या अंगी अंगिकारावा म्हणजे हा जयंती सोहळा यशस्वी होईल असे ते म्हणाले .
यावेळी इयत्ता दहावी व बारावी बोर्ड परीक्षेमध्ये,सी.ई.टी परीक्षेमध्ये यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांचे पालक व गावचे सरपंच उपसरपंच यांच्या समवेत गुणगौरव करण्यात आला.
या कार्यक्रम प्रसंगी पर्यवेक्षिका पुष्पलता गरुड यांनी आबासाहेबांविषयी आपले विचार व्यक्त केले.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती परविन पटेल यांनी तर सूत्रसंचलन श्रीम जरीना शेख,ज्ञानेश्वर गरड यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप प्रा.शिवाजी पोटभरे यांनी केला .
कार्यक्रमास विविध गावचे सरपंच उपसरपंच आजी-माजी प्राचार्य,शिक्षक,पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधू-भगिनी,शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य
लाभले.