राहुरीतील एका शाळेत धक्कादायक प्रकार दहावीच्या विद्यार्थिनीचा हात धरून विनयभंग केला

राहुरी प्रतिनिधी,

दहावीच्या विद्यार्थीनीचा हाथ पकडून तीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार राहुरी शहरातील एका शाळेत उघडकीस आला. संबंधित आरोपीला राहुरी पोलीस पथकाने ताबडतोब ताब्यात घेऊन गजाआड केले. 

        राहुरी शहरातील एका शाळेत विद्यार्थी व विद्यार्थीनी शिक्षण घेत आहेत. त्या शाळेत आरोपी अमरलाल बाबूलाल धुर्वे, वय ४६ हा लिपीक म्हणून कार्यरत आहे. २ ऑक्टोबर २०२५ रोजी दहावीच्या विद्यार्थीनी फाॅर्म भरण्यासाठी आरोपीकडे गेल्या. तेव्हा आरोपी अमरलाल धुर्वे याने एका विद्यार्थिनीचा सही करण्याचा बहाना करुन तीचा हाथ धरुन तीला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्यावेळी संबंधित विद्यार्थीनींनी आरोपी अमरलाल धुर्वे याच्या बाबत शाळा प्रशासनाकडे लेखी तक्रार केली. शाळा प्रशासनाकडून संबंधित आरोपीवर कोणतीच कारवाई न झाल्याने विद्यार्थीनींनी आपल्या पालकांना माहिती दिली. पालकांनी काही सामाजिक कार्यकर्त्यांची मदत घेऊन शाळेत जाऊन संबंधित लिपीक अमरलाल धुर्वे व शाळा प्रशासनला जाब विचारला. त्यांनी पालकांना उडवा उडवीची उत्तरे दिली. 

        तेव्हा संतप्त झालेल्या पालकांनी व पिडीत विद्यार्थीनींनी थेट पोलिस ठाण्यात धाव घेऊन आरोपी अमरलाल बाबूलाल धुर्वे याच्यावर विनयभंग सह पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिस पथकाकडून आरोपी अमरलाल धुर्वे याला तात्काळ अटक करून गजाआड करण्यात आले. न्यायालयाकडून आरोपीला तीन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ हे करीत आहे. मात्र या घटनेमुळे पालक वर्गात संतापाची लाट पसरली आहे.