चांद्यात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू मिश्रित माव्याचा साठा उघड ; सोनई पोलिसांची धडक कारवाई

चांद्यात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू मिश्रित माव्याचा साठा उघड ; सोनई पोलिसांची धडक कारवाई

चांद्यात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू मिश्रित माव्याचा साठा उघड; सोनई पोलिसांची धडक कारवाई!, प्रतिबंधित माव्याच्या विक्रीचा मुद्दा ऐरणीवर

 

महाराष्ट्र शासनाने राज्यात विक्री व साठवणुकीस बंदी घातलेल्या सुगंधी तंबाखू मिश्रित माव्याचा विक्रीच्या उद्देशाने साठा बाळगल्याप्रकरणी सोनई पोलिसांनी चांदा येथे कारवाई केली आहे. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, परिसरातील प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की, बुधवार, दि. ४ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास नेवासा तालुक्यातील चांदा गावच्या शिवारात लोहारवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या सोमेश्वर पान स्टॉल येथे पोलिसांनी कारवाई केली. जयदीप कचेश्वर शेलार (वय ३३, रा. चांदा, ता. नेवासा) याच्यासह चांदा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील चैतन्य गनराज स्टोअर येथील राज कानिफनाथ दरवंडे (वय २४, रा. चांदा) आणि कैलास बऱ्हाटे (रा. घोडेगाव) यांच्याबाबत सुगंधी तंबाखू मिश्रित मावा विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याचा उल्लेख फिर्यादीत करण्यात आला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या प्रतिबंधात्मक आदेशानुसार सुगंधी तंबाखू मिश्रित माव्याची विक्री, साठवणूक व वितरण करण्यास राज्यात बंदी आहे. असे असतानाही या प्रतिबंधित पदार्थांचा साठा करून विक्री केली जात असल्याच्या तक्रारींमुळे अशा व्यावसायिकांवर कारवाई करण्याची गरज अधोरेखित होत आहे.या प्रकरणी सुनील मुरलीधर पालवे (वय ३५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४७६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम २२३, २७४, २७५ व ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सोनई पोलीस ठाण्याचे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस अंमलदार दत्ता गावडे करीत आहेत.प्रतिबंधित माव्याच्या विक्रीला आळा बसणार का?शासनाने आरोग्याच्या दृष्टीने प्रतिबंधित केलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची विक्री काही ठिकाणी सुरू असल्याचे वारंवार समोर येत आहे. विशेषतः पान स्टॉल आणि किरकोळ दुकानांमधून अशा पदार्थांची विक्री होत असल्यास त्यावर सातत्याने लक्ष ठेवणे आवश्यक आहे. सोनई पोलिसांच्या या कारवाईमुळे प्रतिबंधित माव्याची विक्री करणाऱ्यांमध्ये धास्ती निर्माण होण्याची शक्यता असून, परिसरातील अशा विक्री केंद्रांवर नियमित तपासणी व कठोर कारवाई करण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात मावा विक्री होत असल्याबाबत नागरिकांमध्ये चर्चा असून पोलीस कारवाई झाल्यानंतर तात्पुरती विक्री बंद केली जाते मात्र पोलिसांच्या पाठोपाठ नव्या जोमाने विक्री होत असल्याचे वास्तव आहे वास्तविक यावर कारवाई करणे हे अन्न व औषध प्रशासन विभागाने यावर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे पोलिसांकडून तात्पुरत्या स्वरूपात कारवाई करून चिरीमिरी घेऊन पुन्हा जैसे थे असे प्रकार सुरू आहेत सदर कारवाईत या विक्रेत्यांकडून पोलिसांनी चिरीमिरी घेतल्याची उघड चर्चा होत आहे