महावितरणच्या वीजतारांची चोरी ; 48 हजारांचा ऐवज लंपास

महावितरणच्या वीजतारांची चोरी ; 48 हजारांचा ऐवज लंपास

लोहारवाडीत महावितरणच्या वीजतारांची चोरी; ४८ हजारांचा ऐवज लंपास!

पाच गाळ्यांतील तब्बल एक हजार मीटर अॅल्युमिनियमच्या तारा चोरट्यांनी पळवल्या; अज्ञात चोरट्यांविरुद्ध सोनई पोलिसांत गुन्हा दाखल

 

 नेवासा तालुक्यातील लोहारवाडी शिवारात महावितरण कंपनीच्या वीजवाहिनीवरील अॅल्युमिनियमच्या तारांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी तब्बल पाच गाळ्यांमधील सुमारे एक हजार मीटर लांबीच्या वीजतारा चोरून नेल्या असून, या चोरीत महावितरणचे अंदाजे ४८ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय विद्युत कायदा २००३ च्या कलम १३६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १६ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी पाच वाजेपासून ते दि. १७ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान लोहारवाडी येथील शेतगट क्रमांक १०९/१, २, ३ व ४ परिसरात ही चोरी झाली. अज्ञात चोरट्यांनी महावितरण कंपनीच्या एकूण पाच गाळ्यांमधील अॅल्युमिनियमच्या सुमारे एक हजार मीटर लांबीच्या तारा काढून चोरून नेल्या. चोरीस गेलेल्या तारांची किंमत अंदाजे ४८ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.