बालाजी देडगाव येथे दरवर्षी प्रमाणे चंपाषष्ठी निमित्ताने खंडोबा यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न.

नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे चंपाषष्ठी निमित्ताने सालाबाद प्रमाणे जागृत देवस्थान खंडोबा ची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

   या उत्साहा निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते .दररोज सायंकाळी जागरण गोंधळाचा कार्यक्रम होत असे . वेगवेगळ्या नामवंत वाघे यांच्या हस्ते जागरण गोंधळाचा कार्यक्रम संपन्न झाला .

    गावभर खंडेरायाची पौराणिक पालखी मिरवणूक उत्साहात पार पडली .यावेळी पारंपारिक गज ढोल, गज नृत्य या खेळाचे आयोजन करण्यात आले होते.तर पालखी समोर फटाक्याची आतषबाजी

बाजी करून पालखी गावभर मोठ्या उत्साहात मिरवण्यात आली . तर संपूर्ण गाव परिसर येळकोट येळकोट जय मल्हार या खंडेरायाच्या नावाने दुमदुमून गेला होता.या पालखीचे दर्शन घेण्यासाठी भावीक मोठ्या संख्येने उपस्थित होते .यात्रा उत्सव निमित्ताने नगर जिल्ह्याभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात.

     मिरवणुकीनंतर काल खोबरं भंडारा उधळून भाविकांना प्रसाद दिला जातो भाविक मोठ्या श्रद्धेने प्रसादाचा आनंद घेत असतात. व चंपाषष्ठी निमित्ताने तळी भंडारा उचलली जाते व यांनतर खंडेरायाची आरती करण्यात आली.

   या उत्सवाचा शेवट काल्याच्या कीर्तनाने झाला .यावेळी ह भ प राम महाराज खरवंडीकर यांनी आपल्या सुश्राव्य अमृतमय वाणीतून कीर्तन ची सेवा दिली. यावेळी भजनी नवनाथ मुंगसे, जनार्दन तांबे, विनायक माळवदे, सुभाष मुंगसे, वसंत नांगरे आदी भजनी मंडळांनी मोठे सहकार्य करत हा कीर्तनाचा गजर मोठ्या आनंदात पार पाडला.

दररोज अन्नदात्यांनी अन्नदान करून या उत्साहात मोठा सहभागी पुण्याचे काम केले.

     यावेळी या धारिक धार्मिक कामाच्या उत्सवासाठी ह भ प सुखदेव महाराज मुंगसे,आसाराम कुटे, रामभाऊ पाटील मुंगसे, भाऊराव चेमाटे, रामभाऊ पुंड ,रामभाऊ मुंगसे ,आप्पा ससे ,दत्तू भगत ,गोरख गोयकर ,गोरख गोयकर, अरुण मुंगसे ,अशोक कुटे,रायबान कुटे,संजय कुटे ,बाळासाहेब कुटे, गायकवाड दाजी, आदी मान्यवरांनी विशेष सहकार्य करत मोलाचे कष्ट घेतले.