मुळा कारखाना येथून विवाहित महिला बेपत्ता.

मुळा कारखाना येथून विवाहित महिला बेपत्ता.

     .                                 अहमदनगर जिल्हा/वार्ताहर /.                               नेवासा तालुक्यातील मुळा सहकारी साखर कारखाना येथील गट ऑफिस शेजारी डबरी गोसावी समाजातील लोक अनेक दिवसापासून वास्तव्यास आहेत त्या समाजाबरोबर सावंत हा आई पत्नी यांच्याबरोबर वास्तव्यास आहे  प्रकाश सावंत वय 23 वर्ष यांनी दिलेल्या जबाबावरुन सोनई पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली आहे त्यांनी दिलेल्या आपली पत्नी हिला माहेरी जायचे असल्याकारणाने तिला मोटरसायकल वरून घोडेगाव येथील पंचरत्न चौकात सोडून एसटी बस मध्ये बसून दिले परंतु माहेरी श्रीगोंदा येथे पोहोचली नसल्याचे त्यांनी सायंकाळच्या सुमारास तिच्या माहेरी फोन केला असता तिच्या माहेरीकडील लोकांनी ती इकडे आलीच नसल्याचे सांगितले मी आणि माझ्या इतर नातेवाईकांनी तिचा इतरत्र शोध घेतला असता ती मिळून आली नाही तेव्हा माझी खात्री झाली की माझी पत्नी मिसिंग झाली आहे प्रकाश सावंत यांच्या जबाबावरून सोनई पोलीस ठाण्यात मिसिंग ची तक्रार दाखल करण्यात आली असून याप्रकरणी अधिक तपास सोनई पोलीस करत आहेत