कवठ या झाडाचे संगोपन भविष्यात अति महत्त्वाचे तज्ञांचे मत :- मेजर शिवाजीराव पठाडे
देडगाव :- (प्रतिनिधी युनूस पठाण)
(नमस्कार मी मेजर शिवाजीराव गहिनीनाथ पठाडे कवठ या झाडाची काय वैशिष्ट्य आहे व ते आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहे ते थोडक्यात मांडत आहे.)
हा शब्द कानावर पडला तरी तोंडाला पाणी सुटते
लहानपणी कवठ खाण्यासाठी नेहमी भटकंती सुरू असे
कारण त्या काळात कवठाची झाडे खूप दुर्मिळ होती आमच्या राळाला फक्त एकच मोठे कवठीचे झाडं होते ते रामभाऊची कवठ म्हणून प्रसिद्ध होते
या फळाला कठिन कवच असते त्यामुळे याचे देठ ही चिवट आसल्याने फळ सहजा सहजी खाली पडत नाही त्यामुळे आम्ही दगड मारून मारून कच्चे कवठ पाडायचो आणि तेच आवडीने खायचो
आजच्या काळात हे झाडं पाहायलाही कोठे राहीले नाही
या झाडाची रचना वैशिष्ट्यपूर्ण असते. या झाडाचा आकार
महाकाय असा वाढतो. लहानपणी हे झाड खूप कमी वेगाने
वाढत असते. दहा वर्षांचे होईपर्यंत जमिनीच्या वरती खूप
कमी वाढते. कारण, या काळात हे झाड स्वतःची वाढ
जमिनीच्या खाली खोलवर करून घेते. त्यानंतर खूप कमी
काळात हे झाड महाकाय आकार धारण करते. या झाडाला
काटे असतात. याची पाने छोटी व जाड असल्याने या
झाडाला खूप कमी पाणी लागते. शक्यतो उगवल्यानंतर या
झाडाला कधीच पाणी द्यावे लागत नाही. याच्या खोडावर
खपले असतात. या खपल्यावरून या झाडाचे वय किती
असेल याचा अंदाज काढता येतो. ही झाडे उंचच उंच
वाढतात. याचे खोड सरळ वरती जाऊन मग त्याला फांद्या
फुटतात. या फांद्यांना छोटी छोटी पाने येतात. या झाडाला
प्रचंड फुलोरा लागतो. यातील काही फुलोरा गळून जातो,
तर काहीला फळे लागतात. या झाडांना प्रचंड फळे येतात.
ही फळे खाण्यासाठी चविष्ट असतात.
-----------------------------------------------------------------------------------------
-- पर्यावरणामध्ये या झाडाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. हे झाड जमिनीपेक्षा जमिनीखाली जास्त वाढत असल्याने पावसाचे पाणी जमिनीत खोलवर घेऊन जाण्याचे कार्य ते करते. जमिनीच्या पोटात खोलवर लपलेले जीवनसत्व हे झाड वरती घेऊन येते. त्यामुळे याच्या प्रत्येक भागात अनेक जीवनसत्व व गुणधर्म असतात. या झाडावर पक्षी मोठ्या प्रमाणात घरटी करतात. कारण खपल्याची साल असल्यामुळे अनेक शत्रूंना झाडावर चढता येत नाही तसेच काटे अडल्यामुळे कोणालाही या झाडावर सहज झडप घालता येत नाही. त्यामुळे त्यांचे रक्षण होते. हे झाड मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देत असल्याने याला फुलोरा प्रचंड येत असल्यामुळे मधमाश्या खूप जास्त या झाडावर पहायला मिळतात. जाड पाने, खोडावर खपल्या, फळांना कठीण कवच असल्यामुळे याच्या कोणत्याही भागातून पाण्याचे बाष्पीभवन होत नाही. त्यामुळे हे झाड जमिनीत पाण्याचा साठाही करून ठेवते. वातावरणांत हवा शुद्ध ठेवण्याचे कार्य हे झाड करते.
-----------------------------------------------------------------------------------------
आजच्या काळामध्ये कवठ हे झाड नामशेष होण्याच्या
मार्गावर आहे. आज कोठेही हे झाड पहायला मिळत नाही.
आपण कवठ खाल्लेले कित्येक वर्ष होऊन गेले आहेत.
त्यामुळे आता या झाडाचे संगोपन करणे ही आजच्या
काळाची गरच बनली आहे. या झाडाचे फक्त बी लावले तरी
हे झाड आपोआप वाढते. याला कधीही पाणी द्यावे लागत
नाही किंवा याचे रक्षण करण्याची गरच नाही. पक्षांच्या
विष्ठामधून या झाडाच्या बिया सर्वत्र टाकत असतात.
त्यामुळे पाऊस पडला की असंख्य झाडे उगतात. फक्त ही
झाडे जपणे गरजेचे आहे.
सर्व
शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पडीक जागेवर, बांधावर हे
झाड लावले पाहिजे. बालाजी फाउंडेशन, देडगाव च्या वतीने
आम्ही सर्वांना आवाहन करत आहोत की, सर्वांनी एक एक
कवठाचे झाड लावावे व त्याचे संगोपन करावे. हे झाडं
तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला निरोगी, आनंदी, समाधानी
जीवन प्रदान करेल!
वृत्तांत लेखन.
✍????मेजर शिवाजी पठाडे
संस्थापक बालाजी फाऊंडेशन देडगावं