बनसोडे इंग्लिश मीडियम स्कूल माका येथे राखी बनवण्याची कार्यशाळा संपन्न
बनसोडे इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये राखी बनवण्याची कार्यशाळा संपन्न.
बालाजी देडगाव (प्रतिनिधी युनूस पठाण) नेवासा तालुक्यातील माका येथील गुणवत्ता,संस्कार ,व संस्कृती जपणारी शाळा म्हणून अल्पावधीत नावारूपास आलेली व बदलत्या काळानुरूप इंग्रजी शिक्षण देत असताना मराठी संस्कृती जपणारी शाळा म्हणून लौकिक असणारी कै. तात्याबा बनसोडे इंग्लिश मिडीयम स्कूल माका मध्ये राखी बनवण्याची कार्यशाळा संपन्न झाली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून कार्यानुभव अंतर्गत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते,अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सागर बनसोडे यांनी दिली. सर्वप्रथम शिक्षकांनी मुलांना प्रात्यक्षिक करून दाखवले. व राखी बनवण्याची प्रक्रिया विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवली व त्यानंतर मुलींनी स्वतः राख्या तयार केल्या. व स्व हस्ते तयार केलेल्या राख्या बघून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. बाजारातून महागड्या राख्या खरेदी करण्यापेक्षा घरच्या घरी स्वस्त राखी बनवण्याची कृती विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवली.
सदर कार्यशाळा यशस्वीतेसाठी रवी निकम , सौ. शलाका पवार,मीना बनसोडे ,जयश्री पाटेकर,सोनाली बर्फे,मनीषा काळे यांनी विशेष परिश्रम घेतले.