सावित्रीबाई फुले विद्यालयातील विद्यार्थ्यांना डॉ .नानासाहेब पवार सभागृहामध्ये खगोल अभ्यासकांनी आकाशाची दुनिया,दुर्बिणीच्या नजरेतून याबाबत केले उत्कृष्ट मार्गदर्शन .
सावित्रीबाई फुले विद्यालयातील विद्यार्थ्यांना डॉ. नानासाहेब पवार सभागृहामध्ये खगोल अभ्यासकांनी आकाशाची दुनिया, दुर्बिणीच्या नजरेतून याबाबत केले उत्कृष्ठ मार्गदर्शन.

सावित्रीबाई फुले माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता आठवी ते इयत्ता बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना डॉ.नानासाहेब पवार सभागृहामध्ये आकाशाची दुनिया, दुर्बिणीच्या नजरेतून याबाबत खगोल अभ्यासक सुभाष पाडगावकर, अनिरुद्ध बोपार्डीकर व सुभाष सांगळे यांनी छान मार्गदर्शन केले तसेच दुर्बिनिच्या साह्याने आपण कशाप्रकारे माहिती घेऊ शकतो याचे प्रात्यक्षिक पडद्यावर दाखवले .दुर्बीणीद्वारे अवकाशामध्ये घडणाऱ्या हालचाली प्रत्यक्ष पाहण्यास मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये वेगळाच उत्साह निर्माण झाला होता . यावेळी उपस्थित खगोल अभ्यासक यांनी विद्यालयाने घेतलेली दुर्बिण इन्स्टॉल करून कार्यान्वित केली आणि आकाश निरीक्षणाकरिता दुर्बीण कशी वापरावी याबाबत मार्गदर्शन केले .या उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये आकाश निरीक्षण विषयी आवड व जिज्ञासा निर्माण झाली होती .

या कार्यक्रमा प्रसंगी प्रास्ताविक प्रा. जितेंद्र मेटकर यांनी केले. सूत्रसंचालन हलीम शेख यांनी केले .आभार विद्यालयाचे प्राचार्य अरुण तुपविहिरे यांनी केले .या कार्यक्रमासाठी विद्यार्थी शिस्त बाबत क्रीडाशिक्षक घनश्याम सानप ,एनसीसी ऑफिसर संतोष जाधव ,तुकाराम जाधव,तसेच उपस्थित सर्व शिक्षक व शिक्षिका यांनी सहकार्य केले .








