ड्रोनच्या रेकीने नागरिक भयभीत – ममदापूर, राजुरी, कोल्हार परिसरात संशयास्पद हालचालींमुळे खळबळ

ड्रोनच्या रेकीने नागरिक भयभीत – ममदापूर, राजुरी, कोल्हार परिसरात संशयास्पद हालचालींमुळे खळबळ

ड्रोनच्या रेकीने नागरिक भयभीत – ममदापूर, राजुरी, कोल्हार परिसरात संशयास्पद हालचालींमुळे खळबळ

प्रतिनिधी _ प्रसाद घोगरे _ ९३७०३२८९४४.

दि. १९ जुलै २०२५ – ममदापूर, राजुरी, निर्मळ पिंपरी, कोल्हार आणि भाभळेश्वर येथील काही भागात गेल्या महिनाभरापासून रात्रीच्या वेळेस ड्रोनद्वारे होणारी रेकी नागरिकांच्या चिंतेचा विषय ठरली आहे. या भागात संशयास्पद ड्रोन हालचाली वारंवार पाहण्यात आल्या असून, चोरी किंवा गंभीर घटनांची शक्यता नागरिक व्यक्त करत आहेत.

गावकरींच्या सततच्या तक्रारीनंतर स्थानिक पोलीस यंत्रणा सतर्क झाली असली तरी अजूनही या ड्रोनच्या मूळ स्रोताचा शोध लागलेला नाही. दररोजच्या रात्री होणाऱ्या ड्रोन हालचालींमुळे नागरिक भयभीत झाले असून, काहींनी आपल्या घरी सीसीटीव्ही बसवण्यास सुरुवात केली आहे.

पोलिसांची तारांबळ उडाली असून, दरवेळी कॉल आल्यानंतर तात्काळ पेट्रोलिंग सुरू केले जात आहे. मात्र, ड्रोन उडवणाऱ्यांवर अद्याप शोध लागला नसल्याने ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे या भागात मोठी घटना घडण्याची शक्यता नागरिक व्यक्त करत असून, तपास यंत्रणेला अधिक अद्ययावत पद्धतीने काम करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

गावात शंका-कुशंका वाढत चालल्या असून, काही ठिकाणी या हालचालींमागे गुन्हेगारी टोळी कार्यरत असल्याचा संशय आहे. यावर लवकरात लवकर गुन्हे अन्वेषण शाखा किंवा सायबर टीममार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

पोलिस विभागाने सांगितले की, "या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून, लवकरच ड्रोनद्वारे रेकी करणाऱ्यांवर कारवाई होईल."
दरम्यान, नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.