सोनई पोलिसांची बेकायदेशीर कारवाई, गणेश वाडी येथील युवकास विनाकारण बेदम मारहाण.
प्रतिनिधी:- सोनई ,नेवासा
नेवासा तालुक्यातील गणेशवाडी येथील एका युवकास समन्स देण्याच्या कारणावरून पोलीस प्रशासनाकडून अमानुष मारहाण केल्याचे समोर आले आहे.
या विषयावर संदर्भात अशी माहिती प्राप्त झाली आहे की. गणेश वाडी येथील राजेंद्र रायभान मोहिते याला समज देण्यासाठी सोनई पोलीस ठाण्यात बोलावून त्याच्यावर अमानुष मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. न्यायालयीन कुठलेही सर्च वॉरंट, समन्स देण्यासंबंधीचा आदेश नसताना देखील सोनई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागुल, उपनिरीक्षक सचिन पतंगे पोलीस कर्मचारी संजय चव्हाण एक अनोळखी कर्मचारी यांनी सदर तरुणास अमानुष मारहाण केल्याचे दिसून येत आहे.
सदर युवकास प्रचंड दुखापत झालेली असून त्याची स्थिती गंभीर असल्यामुळे त्याला उपचारासाठी प्रवरानगर (लोणी) येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कुठलाही गुन्हा दाखल नसताना अशाप्रकारचे अमानुष रित्या झालेली मारहाण योग्य नाही असे ग्रामस्थांनी प्रतिपादन केले आहे व त्या संदर्भात सर्व ग्रामस्थ नाराज असल्याचे समजते.
झालेले घटनेसंदर्भात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी अशी माहिती दिली आहे की सदर घटनेतील आमच्यावरील आरोपी सर्वतोपरी खोटे आहेत.
सोशल मीडियाच्या दोन ग्रुप मधील विवादात्मक चॅट संदर्भात आम्ही समन्स दिली होती ,अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांनी दिली आहे.