नवरात्राच्या पहिल्या माळेला महिला मंडळ, अमृताहुनी गोड भजन संध्येत श्रीरामपूर मधील भजनी मंडळाचा सहभाग.

श्रीरामपूर:- दि. ०४/१०/२०२४,नवरात्राच्या पहिल्या माळेला महिला मंडळ, श्रीरामपूर तर्फे भारतातील  विविध प्रांतातील आणि विविध भाषांतील अमृताहुनी गोड भजन संध्या - मिले  सुर मेरा तुम्हारा  - या संकल्पनेवर सादर करण्यात आली.भजन संध्येची संकल्पना सौ वैशाली गिरमे आणि सौ प्रीती आगाशे यांनी मांडली होती.

               श्री कालिका भजनी मंडळ, गुजराती महिला मंडळ, संभव जैन मंडळ, सर्व शाखीय ब्राह्मण मंडळ ,आदर्श गीत मंडळ, जय झुलेलाल सिंधी ग्रुप,अमृत गीत मंडळ,जय मातादी मंडळ,नादब्रह्म भजनी मंडळ अशा अनेक भजनी मंडळांनी  वैविध्यपूर्ण  आणि भक्तीरसपूर्ण भजनं  ताल नृत्यासह , संबंधित वेषभूषेसह सादर केली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व विश्वस्त,पदाधिकारी कार्यकारणी सर्व सभासदांनी परिश्रम घेतले  असे प्रमुख विश्वस्त सौ. ज्योती भळगट आणि अध्यक्षा सौ. नीता जगताप यांनी सांगितले.