जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांदा येथे संविधान दिन उत्साहात संपन्न
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांदा येथे संविधान दिन उत्साहात*
*चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेने विद्यार्थ्यांनी व्यक्त केले संविधानाविषयीचे प्रेम*
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चांदा येथे २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. लहानग्या विद्यार्थ्यांमध्ये संविधानाची ओळख व्हावी, लोकशाही मूल्यांची रुजवण व्हावी, या उद्देशाने शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी शाळेत चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी संविधान, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रध्वज, समता-बंधुता या विषयांवर सुंदर चित्रे काढून आपली कल्पनाशक्ती दाखवली. तसेच विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धाही घेण्यात आल्या. यामध्ये विद्यार्थ्यांनी संविधानाचे महत्त्व, आपले हक्क आणि कर्तव्ये यावर आत्मविश्वासाने आपली मते व्यक्त केली.
यावेळी शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करत संविधान दिनाविषयी मुलांना मार्गदर्शन केले. संविधानामुळे आपल्याला मिळालेले अधिकार, त्यासोबतची कर्तव्ये, शिस्त, एकता आणि देशप्रेम याविषयी शिक्षकांनी सोप्या भाषेत समजावून सांगितले.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक संजय जावळे, शांता मरकड, मीना गर्जे, सुनिता पुरी, शारदा दुसंग, शरद गोसावी, विजय बनकर, ओम जऱ्हाड यांच्यासह शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.








