जय हनुमान पाणी वापर संस्थेच्या अध्यक्षपदी सतिश केदार यांची बिनविरोध निवड.
जय हनुमान पाणी वापर संस्थेच्या चेअरमन पदी प्रगतशील शेतकरी सतीश भिवसेन केदार यांची बिनविरोध निवड.
भारत भालेराव
ग्रामीण प्रतिनिधी शेवगाव
शेवगाव :शेवगाव तालुक्यातील गरडवाडी येथील जय हनुमान पाणी वापर संस्थेची पाटबंधारे सिंचन विभाग अमरापूर या ठिकाणी सभा झाली सभेसाठी जय हनुमान पाणी वापर संस्थेचे सर्व नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते चेअरमन पदासाठी सूचक म्हणून संचालक जनार्दन काशिनाथ खेडकर यांनी ठराव मांडला.व त्यास भाऊराव देशमुख यांनी अनुमोदन दिले.यावेळी संचालक मंडळ विशाल भागिनाथ सांगळे,जनार्दन काशिनाथ खेडकर,संगीता राजेंद्र देशमुख, सारंगधर रामराव गरड,कचरू लक्ष्मण चोथे,यमुनाबाई विक्रम सांगळे,भाऊराव दिगंबर देशमुख,नंदा प्रल्हाद देशमुख संस्थेचे सचिव इत्यादी उपस्थित होते. निवड बिनविरोध पार पाडण्यासाठी सरकारी अधिकारी म्हणून मुळा पाटबंधारे विभाग अमरापूर लाटे साहेब यांनी काम पहिले.ग्रामपंचायत सदस्य साईनाथ गरड,विष्णू गरड,सेवा सोसायटी मा चेअरमन भिवसेन केदार,बाळासाहेब आंधळे, पांडुरंग सांगळे यांनी जय हनुमान पाणी वापर सोसायटी गरडवाडी या संस्थेच्या चेअरमन बिनविरोध निवडीबद्दल कौतुक व अभिनंदन केले.