राहुरी तालुक्यात 21 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत 83.31 टक्के मतदान .
राहुरी तालुक्यात २१ ग्रामपचती च्या निवडणुकीत ८३. ३१ टक्के मतदान
आर . आर .जाधव प्रतिनीधी
राहुरी तालुक्यातील २१ ग्रामपंचायत निवडणुकी साठी दि .५ नोव्हेंबर रोजी झालेल्या ८३. ३१ टक्के . मतदान झाले असुन सरपंच पदाच्या ६८ तर सदस्य पदाच्या ५१० उमदेवारांचे भवितव्य इ. व्ही एम मशिन मध्ये बंद झाले आसुन आज दि रोजी राहुरी तहसील कार्यालय आवारात मतमोजणी होणार आहे .गावनिहाय झालेलं मतदान कंसात टक्केवारी कानडगांव २३०६ ( ८८ .१५ ) चिचोली २२६६ ( ८३.५८ ) निभेरे १७३६ ( ८३.३८ ) सडे २२७६ (९०.७ १ डिग्रस ३३७६ ( ७४.१५ ) घोरपड वाडी ९९० ( ९६ .३०) मोमीन आखाडा १५२६ ( ९२.७७ ) दरडगाव थडी ११६० ( ८६.८९ ) धामोरी बुद्रुक १०७५ ( ८५.९३ ) धामोरी खुर्द ९९९ ( ९३.५४ ) म्हैसगांव १९१९ ( ८३.११ ) देसवंडी १८८७( ९३ .७४ ) तमनर आखाडा १० ७९ ( ८९ . ९२ ) बारागाव नांदुर ५३१३ ( ७९.५७ ) शिलेगाव ११०१ (८३ ३१ ) टाकळीमियाँ ६४९५(८१ .७१ ) मुसळवाडी १३६८(७१. ७७) मालुंजे खुर्द १२६२ ( ८९ . २७ ) माहेगाव १२३३ ( ८७ . २० ) प्रमाणे ग्रामपचायतीचे मतदान झाले असुन आज सकाळी १० वाजता मतमोजणी होत आहे .कोणाचा गुलाल होईल याची उत्सुकता सर्व कार्यकर्त्यांना ना लागली आहे .मतमोजणी साठी प्रशासनाने पुर्ण तयारी केली असून मोठा पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला आहे . जेणे करून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने खबरदारी घेतली आहे .