करुणा माता चर्च, वैजापूर येथे नेवासे, घोडेगाव, बाभळेश्वर, नेवरगाव, वैजापूर, श्रीरामपूर व जवळपासच्या अनेक भाविकांनी पवित्र क्रूस तीर्थक्षेत्र, वैजापूर येथे येऊन क्रुसाची वाट आपल्याला भावेल तो क्रुस घेऊन प्रार्थना केली.
श्रीरामपूर ( प्रतिनिधी) :- उपवास काळ सुरू होऊन १५ व्या दिवशीही दिनांक बुधवार 28 फेब्रुवारी 2024 रोजी करुणा माता चर्च, वैजापूर येथे नेवासे, घोडेगाव, बाभळेश्वर, नेवरगाव, वैजापूर, श्रीरामपूर व जवळपासच्या अनेक भाविकांनी पवित्र क्रूस तीर्थक्षेत्र, वैजापूर येथे येऊन क्रुसाची वाट आपल्याला भावेल तो क्रुस घेऊन प्रार्थना केली. रेव्ह फा. संजय ब्राह्मणे, रेव्ह.फा. रणनवरे, रेव्ह फा. संजय पंडित, रेव्ह.फा.सतीश कदम, ब्रदर अक्षय यांनी सर्व भाविकांसाठी मिस्सा अर्पण केला. आज सर्वांसाठी मोठय़ा प्रमाणात अन्नदान देखील झाले व श्री पंडीत साहेब यांचे कडून तिर्थक्षेत्रासाठी असलेल्या कंम्पऊंड ग्रिल वरील २२ नग गेट लाईट हंडी मदत देखील लाभली. या पुढील उपवासाचे दिवसात येणाऱ्या भाविकांसाठी अन्नदान करण्यासाठी अन्नदाते उस्फुर्तपणे सहभागी होत आहेत. रेव्ह. फा. संजय ब्राह्मणे यांनी सर्व भाविकांचे व मदत करणारे भाविकांचे आभार
मानले.