नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा - डुंगरवाल यांची महसूलमंत्री विखे पाटील यांच्या कडे मागणी.
श्रीरामपूर ( प्रतिनिधी ) - मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने अहमदनगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठं नुकसान केले. अहमदनगर जिल्ह्यात द्राक्ष ,पपई केळी, पेरू अनेक फळ बागा, रबी ज्वारी तसेच कापूस पिकांचं मोठं नुकसान या पावसामुळे झाले. नेहमीप्रमाणे शेतकऱ्याने रक्ताचे पाणी करून पीक मोठी करायची आणि हाता तोंडाशी घास आला की निसर्गाने तो हिरावून घ्यायचा हे नेहमीचेच झाले आहे.आता सरकारने नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी .अशी मागणी आम आदमी पार्टी चे तिलक डुंगरवाल यांनी महाराष्ट्र महसूलमंत्री तसेच अहमदनगर जिल्हा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे. सध्या राज्यभर गारपीट ,मुसळधार पाऊस सगळीकडे सुरू आहे. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणावर पाऊस होऊन बळीराजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले पाहायला मिळते आहे .यामध्ये हातात तोंडाशी आलेला घास हिसकावला जातो आहे .यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या शेतकऱ्यांना वर्षभर आपल्या शेतीत काबाडकष्ट करून पिकवलेला माल हा असा अस्मानी संकटामुळे नेस्तनाभूत होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल आहे .
परंतु सतत होणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतीचे झालेल्या नुकसानी मुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. या शेतकऱ्यांना त्यांच्या झालेल्या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे होऊन त्यांना आर्थिक मदत प्राप्त व्हावी अशी मागणी आपचे तिलक डुंगरवारल यांनी
महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तसेच अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्यांच्याकडे केली आहे