*औद्योगिक प्रशिक्षण संस्था, श्रीरामपूर येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा पदवीदान दीक्षांत समारंभ*
औद्योगिक प्रशिक्षण संस्था, श्रीरामपूर येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा पदवीदान दीक्षांत समारंभ*
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुबई १ अंतर्गत असलेल्या प्रथमतःच सुरू झालेल्या पदवीदान दिक्षांत समारंभ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, श्रीरामपूर येथे ऑगस्ट २०२२ मध्ये झालेल्या अ. भा. व्यवसाय परीक्षेत विशेष गुण संपादन करून प्रथम,द्वितीय व त्रितीय श्रेणी मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आज दि. १७/०९/२०२२ रोजी सकाळी ११:०० वाजता संस्थेचे प्राचार्य, श्री. व्ही व्ही थोटे साहेब,समारंभाचे प्रमुख पाहुणे मा. श्री. शैलेशजी आंबेकर ( संचालक,ट्रस्टने इंडिया प्रा. लि. ) व मा. श्री. प्रदिपजी जगधनी ( प्रोडक्शन मॅनेजर BTU ) यांचे शुभहस्ते प्रथमतः दीप प्रज्वलन करुन गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह, पदवी प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांचे पालकांनाही पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले. या समारंभाचे अध्यक्ष मा. श्री. संभाजी मोरे व प्रमुख पाहुणे यांनी या गुणवंत विद्यार्थी व संस्थेतील उपस्थित विद्यार्थी यांना उज्वल भविष्य साठी उद्बोधन करुन शुभेच्छा दिल्या. प्रसंगी संस्थेतील सर्व शिल्प निदेशक श्री. चौधरीसर, श्रीमती. घोडके मॅडम, श्री. भुसारी सर, श्री. बागुल सर श्रीमती इंगळे मॅडम व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी या समारंभाचे नियोजन केले तर सुत्रसंचलन श्री. पालवे सी एम सर यांनी केले आणि उपस्थितांचे आभार श्री. भगत जे डी यांनी मानले व समारंभाची सांगता केली.