खेडले परमानंद जि .प. प्राथमिक शाळेत शाळा पूर्वतयारी मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.

खेडले परमानंद जि .प. प्राथमिक शाळेत शाळा पूर्वतयारी मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.

प्रतिनिधी :-खेडले परमानंद ,नेवासा

 जि.प.प्राथमिक शाळा खेडले परमानंद येथे शाळा पुर्व तयारी मेळावा मोठया उत्साहात पार पडला यावेळी इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या मुलांचे सहर्ष स्वागत वाजतगाजत करन्यात आले.

            शालेय जीवनात पदार्पण करताना विद्यार्थ्यांचे अशा प्रमाणे स्वागत केल्या मुळे त्यांची शाळेविषयी गोडी वाढण्यास मदत होते

 या मेळाव्याची माहिती व त्याची पार्श्वभुमी शाळेतील शिक्षक श्री संतोष निमसे सर यांनी सांगितली. कुंभार जशी चिखलाच्या गोळ्यापासून मडके बनवतो व त्याला परिपक्व करण्यासाठी भट्टीत ताव देऊन परिपक्व करतो अगदी त्याचप्रमाणे परिपक्व विद्यार्थी घडवण्याचे कार्य जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेडले परमानंद येथील  संतोष निवसे सर यांनी केलेले आहे. त्यांना वेळोवेळी ग्रामस्थांचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले आहे

अनेक उपक्रमांनी या कार्यक्रमाची सुरुवात झाली

१) नावनोंद

२)शारिरिक विकास

३)बॊध्दिक विकास

४)सामाजिक आणि भावनात्मक विका

५) गणनपुर्व तयारी

६ )भाषिक विकास

मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. त्याच प्रमाणे कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक कुशलता व शारीरिक चंचलता तपासण्यासाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकांनीही भाग घेतला होता

           अतिशय विलोभनीय क्षण व या विलोभनीय क्षणाचा सर्वांनी मनमुराद आनंद घेतला

या कार्यक्रमासाठी केंद्रप्रमुख सुभाष नाईक सर,राजेंद्र खर्डे सर,वाजिद पठाण सर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते

       त्याचप्रमाणे ग्रामस्थांमध्ये

भाऊसाहेब गिरी मोकाशी, दादासाहेब रोठे, डॉक्टर गुरसाळ उपसरपंच प्रशांत  तुवर ग्रामपंचायत सदस्य रमेश बनकर, संदीप केदारी, जावेद इनामदार, तंटामुक्ती उपाध्यक्ष राजेंद्र बर्डे,  ज्येष्ठ ग्रामस्थ शिवाजी राजाळे, भानुदास शिंदे, चंद्रकांत जाधव, सूर्यकांत केदारी,  संजय दुशिंग, नितीन मोकाशी, विजय शिंदे, शिवाजी सूर्यवंशी, वसीम भाई इनामदार . काशिनाथ नेमणे, रावसाहेब सोनकांबळे, विशाल तुवर, अन्वर इनामदार, प्रशांत केदारी, पेत्रस वैरागर, राहुल वैरागर, बंडू वैरागर, गणेश शिं

           त्याचप्रमाणे महिला आरोग्य अधिकारी भुसारी मॅडम, अंगणवाडी सेविका रंजना राजाळे, मुख्याध्यापिका सविता आव्हाड मॅडम, सविता दरंदले मॅडम, सुरेखा शिंदे, सुशीला बर्डे,हिराबाई सूर्यवंशी, वैष्णवी भुजबळ, सुनीता शिंदे, योगिता शिंदे, हिराबाई गोलवाड , पुष्पाताई गोसावीआदी महिला भगिनी उपस्थित होत्या...