राहुरी शहरात प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विद्यालयाने उभारला दिव्य रामेश्वरम ज्योतिर्लिंग दर्शनाचा देखावा .

राहुरी शहरात प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विद्यालयाने उभारला दिव्य रामेश्वरम ज्योतिर्लिंग दर्शनाचा देखावा .

राहुरी शहरात प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालयाने उभारला दिव्य रामेश्वरम ज्योतिर्लिंग दर्शनाचा देखावा .

 

              महाशिवरात्री उत्सवानिमित्त राहुरी शहरातील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने दिव्य रामेश्वरम ज्योतिर्लिंग दर्शन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. तीन दिवस चालणाऱ्या या सोहळ्याचे उद्घाटन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. साताप्पा खरबडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले. महाशिवरात्री हा परमात्मा अवतरण दिवस म्हणून याप्रसंगी कुलगुरू डॉ. साताप्पा खरबडे यांच्या शुभहस्ते व सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत शिव परमात्म्याचा शिवध्वज फडकविण्यात आला.यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. भगवान देशमुख, डॉ. गव्हाणे हॉस्पिटलचे संचालक डॉ. सत्यजित गव्हाणे, राहुरी येथील व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष श्री. प्रकाशशेठ पारख, डॉ. सूर्यकांत रोकडे, डॉ. वैशालीताई रोकडे, विस्तार शिक्षण अधिकारी श्री. रवींद्र थोरात, सी न्यूजचे संचालक श्री. वसंतराव झावरे, डॉ. अरुणा भंडारी, श्री. ठाकरे सर,श्री. मंगेश पगारे सर, तसेच विद्यालयाच्या संचालिका ब्रम्हाकुमारी नंदादीदी, खुशी दीदी, मंगल दीदी, अश्विनी दीदी, प्रतिभा दीदी यावेळी उपस्थित होत्या.

              विद्यालयाच्या वतीने यावेळी महाशिवरात्री पावन पर्वनिमित्त 25 फूट दिव्य श्री रामेश्वरम ज्योतिर्लिंग मंदिर, लेझर शोद्वारे ईश्वरी अनुभूती व सहस्त्र शिवलिंग दर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. यावेळी कुलगुरू डॉ. साताप्पा खरबडे म्हणाले की महाशिवरात्रीच्या निमित्ताने विद्यालयाने उभारलेला दिव्य रामेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन सोहळा सर्व भाविकांसाठी एक पर्वणी असून प्रत्येकाने आपापसातील सर्व भेद मिटवून एकमेकांशी सद विचाराने चांगल्या प्रवृत्तीने वागावे. विद्यालयाच्या संचालिका ब्रह्माकुमारी नंदादीदी यावेळी म्हणाल्या की सर्व आत्म्यांचा पिता शिव परमात्मा असून प्रत्येकाने या शिव परमात्म्याचे ध्यान करून आपले जीवन सुंदर बनवावे. यावेळी विद्यालयाचे सर्व भाऊ बहिणी तसेच शहरातील सन्माननीय नागरिक, पत्रकार मित्र उपस्थित होते.