खेडले परमानंद येथे वीस वर्षीय युवकावर बिबट्याचा प्राण घातक हल्ला .
खेडले परमानंद प्रतिनिधी// दि 1 मार्च
नेवासा तालुक्यातील खेडले परमानंद या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात रोहित सूर्यकांत तुवर हा वीस वर्षीय युवक गंभीर जखमी झाला आहे .
याबाबतचा सविस्तर वृत्तांत असा आहे की खेडले परमानंद येथे दिनांक एक मार्च रोजी सायंकाळी सात वाजता सदर युवक दूध घालण्यासाठी गावामध्ये आला असता घरी परतत असताना बिबट्याने दुचाकी वर असताना त्याच्यावर प्राण घातक हल्ला चढवला परंतु सदर युवकांने त्या ठिकाणावरून पळ काढीत आरडाओरडा केला जवळील वस्तीवरील लोक पळाले व त्याची मदत केली त्यामुळे सदरचा युवक या प्रसंगातून बचावला .त्याच्यावर डॉक्टर हरेकृष्ण गुरसाळ यांच्या ज्ञानेश्वरी हॉस्पिटल या ठिकाणी प्राथमिक उपचार करण्यात आले .
दिवसो दिवस खेडले परमानंद परिसरात बिबट्याचे हल्ले वाढत चाललेले आहेत प्रशासन मात्र संबंधित गोष्टीला गांभीर्याने घेत नसल्यामुळे हा प्रकार घडून आलेला आहे.
पिंजरा लावून सुद्धा पिंजरामध्ये बिबट्या अडकला जात नाही .
त्यामुळे वनविभागाने सुद्धा या गोष्टी पुढे हाट टेकल्याचे चित्र दिसून येत आहे .
पेट्रोल पंपा जवळून येणारा रस्ता विद्यार्थ्यांसाठी कायम वरदळीचा आहे त्यामुळे हा हल्ला पुन्हा होण्याची शक्यता आहे म्हणून प्रशासनाने या बिबट्यांचा बंदोबस्त करून बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे .
अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने व्यापक स्वरूपाच्या आंदोलन करण्यात येईल.असा इशारा सामाजिक कार्यकर्ते संभाजी शिंदे यांनी दिला आहे.








