बनावट दिव्यांग प्रमाणपत्र बनवून शासनाची फसवणूक करणारे दाम्पत्य अटक

बनावट दिव्यांग प्रमाणपत्र बनवून शासनाची फसवणूक करणारे दाम्पत्य अटक

 

 *बनावट दिव्यांग प्रमाणपत्र बनवून शासनाची फसवणूक करणारे दाम्पत्य अटक* 

 

       सदर घटनेची हकिकत अशी की राहुरी पोलीस स्टेशन येथे गु.र.नंबर 613/2025 भारतीय दंड विधान कलम 468,471 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्यातील आरोपी  ताज निसार पठाण आणि रुबीना ताज पठाण या पती-पत्नींनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र बनवून घेऊन संजय गांधी निराधार योजना व इतर दिव्यांगांना मिळणाऱ्या योजनेचा लाभ घेऊन शासनाची फसवणूक केले बाबत दिपक नामदेव साळवे ग्राम महसूल अधिकारी देवळाली प्रवारा यांनी फिर्याद दिली होती. सदर गुन्ह्याच्या तपास अनुषंगाने नमूद पती-पत्नीला ताब्यात घेऊन सदर गुन्ह्यात अटक केली असून मा.न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालय कडून आरोपी त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. सरकारतर्फे शासकीय अभियोक्ता श्री. पाटील साहेब यांनी बाजु मांडली. आरोपीकडे बनावट दिव्यांग प्रमाणपत्रा बाबत माहिती काढून मूळ सूत्रधार शोधून व बनावट प्रमाणपत्र बनवून देण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटल व इतर कार्यालयातील जे शासकीय कर्मचारी अधिकारी सामील असतील त्यांना अटक करून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजु जाधव, पोकॉ. गणेश लिपणे, मपोकॉ. वृषाली कुसळकर हे करत आहेत. 

       सदरची कारवाई  सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहमदनगर,  सोमनाथ वाकचौरे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर , डॉ.बसवराज शिवपुजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर उपविभाग जिल्हा अहिल्यानगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पो.नि.संजय आर.ठेंगे, पोसई राजु जाधव ,पोकॉ. गणेश लिपणे , पोहेकॉ. राहुल यादव, पोकॉ. शेषराव कुटे, मपोकॉ. वृषाली कुसळकर, मपोकॉ. अंजली गुरव नेमणुक राहुरी पोलीस स्टेशन जि. अहिल्यानगर व पो.ना.संतोष दरेकर, नेमणुक अपर पोलीस अधीक्षक सो श्रीरामपुर जि.अहमदनगर मोबाईल सेल यांनी केलेला आहे.