ओम प्रो ऍक्टिव्ह अबॅकस स्कूल देडगाव ने गोल्ड मेडल मिळवून शिरपेचा रोवला मानाचा तुरा.

ओम प्रो ऍक्टिव्ह अबॅकस  स्कूल  देडगाव ने गोल्ड मेडल मिळवून शिरपेचा रोवला मानाचा तुरा.

बालाजी देडगाव:- (प्रतिनिधी युनूस पठाण)नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील ओम् प्रोऍक्टिव् अबॅकस ने आताच छत्रपती संभाजी नगर येथे झालेल्या प्रोऍक्टिव्ह अबॅकस आयोजित नॅशनल कॉम्पिटिशन 2023 रिजनल लेवल 12 डिसेंबर रोजी झालेल्या झालेल्या स्पर्धेत घवघवीत यश संपादन करून गावाच नाव उंच करण्याचं काम केले आहे.

              दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी झालेल्या या स्पर्धेत काही मुलांना ट्रॉफी तर काहींना गोल्ड मेडल मिळाले . तर यामध्ये *पिसे गौरव सुनील पहिला रँक*, *काळे अर्णव दादासाहेब दुसरा रँक*, *कोलते अथर्व ज्ञानदेव चौथा रँक*, *मुटकुळे अथर्व राजेंद्र चौथा रँक, कदम गौरव अशोक पाचवा रँक, कदम आरोही अशोक पाचवा रँक* यांना ट्रॉफी मिळाली तर टांगळ अजित संतोष ,मुटकुळे रुद्र राजेंद्र, मुंगसे रूनित सचिन, मुंगसे ज्ञानेश्वरी अजित ,कदम वेदांत प्रशांत ,काळे वेदांती दादासाहेब ,चेडे पूर्वी शिवाजी ,दारकुंडे सिद्धार्थ शशिकांत, तांबे शिवम शरद यांना गोल्ड मेडल मिळाले.

         या मुलांच्या यशाबद्दल *ओम प्रो ऍक्टिव अबॅकस ला बेस्ट सेंटर या अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.* या पुरस्काराबद्दल ओम प्रो ऍक्टिव्ह अबॅकस चे व गुणवंत विद्यार्थ्यांचे परिसरातून व तालुकाभरातून कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे. 

                  या घवघवीत यशाबद्दल गावचे सरपंच चंद्रकांत मुंगसे ,जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळाचे मुख्याध्यापक सतीश भोसले सर ,अहिल्याबाई होळकर शाळेचे मुख्याध्यापक स्वरूपचंद गायकवाड सर, तक्षशिला इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक विठ्ठल कदम सर, जिल्हा परिषद प्राथमिक तांबे वस्ती शाळेचे मुख्याध्यापक कचरे सर यांच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.तसेच ओम प्रो ऍक्टिव्ह अबॅकस च्या संचालिका सौ. मीनाक्षी लक्ष्मण मुंगसे व लक्ष्मण मुंगसे सर यांनीही मुलांचे कौतुक केले.