सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी राजू ससाणे यांची बढती झाल्याबद्दल देडगाव ग्रामस्थांच्या वतीने नागरी सन्मान.

सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी राजू ससाणे यांची बढती झाल्याबद्दल देडगाव ग्रामस्थांच्या वतीने नागरी सन्मान.

*सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी राजू ससाणे यांची बढती झाल्याबद्दल देडगाव ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सन्मान.*

 बालाजी देडगाव :- (प्रतिनिधी युनूस पठाण)नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे गावचे भूमिपुत्र राजू चंद्रकांत ससाणे यांची पोलीस प्रशासनामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी शेवगाव येथे बढती झाल्या बद्दल गावच्या वतीने भव्य नागरि सन्मान करण्यात आला.तर मोठा मित्रपरिवार असल्याने त्यांच्याही वतीने सन्मान करण्यात आला.

           हा सन्मान सोहळा ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केला असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिक्षण भूषण ज्येष्ठ नागरिक बाजीराव पाटील मुंगसे यांनी भूषविले असून सरपंच चंद्रकांत मुंगसे यांनी आपल्या प्रास्ताविकातून नूतन निवड बद्दल शुभेच्छा दिल्या. अनेक मान्यवरांनी ही आपले मनोगत व्यक्त करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

            यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू ससाणे बोलताना म्हणाले की, जे काही गावांनी प्रेम दिले मी आपला कायम ऋणी राहील .वेगवेगळ्या सत्कारपेक्षा गावचा सत्कार हा मान उंचावणारा आहे .आज माझे मन भारावून गेले . गावच्या अडीअडचणीमध्ये नेहमी तत्पर राहील अशा भावना व्यक्त केल्या.

         सन्मान सोहळ्याप्रसंगी खरेदी विक्री संघाचे मा. संचालक कडूभाऊ तांबे, प्रगतशील बागतदार शेतकरी चंद्रभान कदम ,ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, देडगाव सोसायटीचे मा चेअरमन बाबासाहेब मुंगसे अशोकराव क्षीरसागर, मा. सरपंच दत्ता पाटील मुंगसे, सोसायटीचे चेअरमन रामदास तांबे, बालाजी पाणी वाटप संस्थेचे माजी चेअरमन संतोष तांबे, व्यवसायिक संघटनेचे अध्यक्ष किशोर मुंगसे गायकवाड अशोकराव , मोहोळकर मामा,भगवान मुंगसे ,विलास मुंगसे ,भिमराज मुंगसे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

       या कार्यक्रमाचे आभार अशोकराव क्षीरसागर यांनी मानले.