श्रीराम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा.

श्रीराम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा.

श्रीराम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात योग दिन उत्साहात साजरा....

आव्हाणे बु :- आज दि.21रोजी श्रीराम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ढोरजळगाव येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस वेगवेगळ्या प्रकारची योगासने करून अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी योगगुरू पंकजजी डहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली योगाचे विविध प्रात्यक्षिक करून दाखवले. तसेच डहाळे यांनी योगाविषयी बोलताना योग माणसाला शारीरिक आणि मानसिक समृद्धी प्रदान तर करतोच, त्यामुळे आध्यत्माची ओढ सुद्धा मनुष्यामध्ये निर्माण करण्याची शक्ती निर्माण करतो, यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी यांनी योगासनांची प्रात्यक्षिके केली.

24 सप्टेंबर 2014 रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाच्या समोर योगासनाचे महत्व पटवून देत आजचा दिवस आतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून संपूर्ण विश्वामध्ये साजरा करण्यात यावा याचे आवाहन करण्यात आले होते. तेच आता सत्यामध्ये उतरत असताना दिसत आहे.

   यावेळी ढोरजळगाव गावचे सरपंच डॉ सुधाकर लांडे,ढोरजळगाव ने चे सरपंच गणेश कराड, ग्रामपंचायत सदस्य देविदास गिऱ्हे,विद्यालयाचे प्राचार्य संजयजी चेमटे,पर्यवेक्षक सुनील जायभाये,ढोरजळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र ढोरजळगावचे आरोग्य अधिकारी डॉ.सुशील बडे, डॉ.जाधव,डॉ.प्रशांत बुधवंत,दै. पुढारीचे पत्रकार ज्ञानेश्वर फसले, पत्रकार दीपक खोसे,संभाजी लांडे, आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी व विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित

होते.