धर्मगुरु पदाची २५ वर्ष पूर्णत्वास....रेव्ह फा प्रकाश भालेराव यांना सन्मानित
श्रीरामपूर ( प्रतिनिधी ):- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ वी जयंतीचे औचित्य साधून महामानव, राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.श्रीरामपूर येथील लोयोला सदन चर्चचे प्रमुख धर्मगुरू रे. फा. प्रकाश भालेराव यांना ख्रिस्ती धर्मगुरु पदाची गुरुदिक्षेला २५ वर्षे पूर्ण झाली. त्याबद्दल महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेच्या वतीने आणि ऑल पास्टर्स फेलोशिपच्या वतीने टॉफी, शॉल व पुस्तके देवून रे.फा. प्रकाश भालेराव यांना सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी सन्मानित धर्मगुरु यांनी आपले मनोगत करताना परमेश्वराचे आभार मानले आणि प्रभूच्या मळ्यात काम करत असताना सर्व भाविकांची माझ्या पाठींशी असलेली ताकद तसेच आपल्या सर्वाचे आशिर्वाद आणि प्रार्थना असल्यामुळे मला प्रभूची व समाज्याची सेवा करण्यासाठी पाठबळ मिळते. त्यामुळे मी परमेश्वराचे कार्य करत आहे.
याप्रसंगी सौ मंगला संजय दुशिंग यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जंयती संपूर्ण जगात साजरी होत असताना आज आपण धर्मगुरूना सन्मानित करत आहेत. यांच महामानावने देशासाठी राज्यघटना लिहिली. महिलासाठी व त्यांच्या हक्कासाठी कायदे लिहिले त्यामुळे महिलाही शिक्षणात मागे नाहीत. याप्रमाणे फादरानी देखील विविध धार्मिक लेखन करून परमेश्वराची सेवा केली त्याचबरोबर समाजकार्य देखील केले.
लेविन भोसले सरांनी फादरांचा थोडक्यात परीचय करून दिला. निरोपाच्या मासिकांचे संपादक म्हणून, पत्रकारीता शिक्षण घेतले, तसेच बायबल शिबिर, धार्मिक व सामाजिक कार्य यामध्ये त्यांचे खूप मोठे योगदान आहे.
याप्रसंगी उपस्थितीतामध्ये पॅरिश कौन्सिल कमलाकर पंडीत, ऑल पास्टर्स फेलोशिपचे अध्यक्ष पा राजेश कर्डक, पा. विजय खाजेकर, पा. सुभाष खरात, पा. सतिश आल्हाट, पा. प्रविण गायकवाड, पा. आण्णासाहेब अमोलिक, पा. सोळसे, पा. अशोक त्रिभुवन, पा. सुनिल बार्से, पा. राजेश शिंदे, पा. विशाल शेलार, पा. चेतन सातदिवे इ. पास्टर्स, महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेचे जिल्हाध्याक्ष दिपक कदम, विश्वस्त अजितकुमार सुडगेसर, प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब तोरणे सर, मंगल गायकवाड, शोभा त्रिभुवन, लता बनसोडे, हेमा थोरात, पुष्पा खंडागळे, प्रतिभा पंडीत, लुसिया तपासे, सि. नालिनी आल्हाट, सि. अनिता बार्से, मंगल सगळगिळे तसेच उत्सव समितीतील राजु साळवे, जेम्स पंडीत, बबलू लोंढे, संदीप साळवे, राजेंद्र केदारी, प्रमोद शिंदे, ललित गायकवाड, दिलीप सगळगिळे, योसेफ खंडागळे, आदेश दुशिंग, रणजित लोखंडे, अविनाश बनसोडे, प्रशांतराजे शिंदे, प्रकाश निकाळे, संजय दुशिंग, शरदराव पंडीत, रविंद्र अकुंश, अजित बारसे आदिंसह अंसंख्य भविक उपस्थित होते. याप्रसंगी सुत्रसंचालन रविंद्र लोंढे यांनी केले तर आभार अजितकुमार सुडगे सर यांनी मांडले.