*महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिति शाखा हिंगना जिल्हा नागपूर*
समाज
*महारार्ष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती शाखा हिंगणा, जि. नागपूर* *BPS Live news N-Delhi*. नागपूर:-आज दिनांक १४ / ०६ / २०२२ रोजी महाअंनिस चि वटपौर्णिमा कार्यक्रम. *किशोरींना करण्यात आले मार्गदर्शन* वटपौर्णिमा च्या निमित्ताने ऐक आगळावेगळा प्रबोधन व पर्यावरण संवर्धन असा कार्यक्रम राबविण्यात आला. समितीच्या कार्यकर्त्यां नागपुर जिल्हा प्रधान सचिव, नलिनीताई शेरकुरे यांनी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांना वंदन करून तसेच संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून कार्यक्रमाचि सुरुवात केली. समिति चे उद्देश व पंचसूत्री समजाऊन सांगुन वटपौर्णिमेला फक्त एका वडाच्या झाडाची पुजा न करता सर्वच झाडांचे रोपंन करुन त्यांचे संवर्धन करणे आवश्यक असल्याचे पटवुन दिले. आजकाल लग्न झालेल्याच महिला नाही तर कुमारीका सुद्धा उपवास व वडाची पुजा करतात म्हणुन किशोरीवयीन मुलींना उद्याचे भविष्याची सुकर वाटचालीकरीता मुलींनी, महिलांनी महात्मा फुलेंचि सावित्री स्विकारलि पाहिजे *वट सावित्री नाही तर विवेक सावित्री स्विकारली पाहिजे* अशी थोडक्यात भुमिका मांडुन आपला वैद्यानिक दृष्टीकोनाचा वापर करून विवेक सावित्री आचरणात आणण्यासाठी किशोरींनी पुढाकार घ्यावा असा संदेश दिला. यासाठी महाअंनिस हिंगणा शाखा कार्याध्यक्ष, सचिव सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सहकार्य केले