माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वर जीवघेणा हल्ला!

काटोल विधानसभा क्षेत्रात माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे नरखेड येथील सांगता सभा आटपुन काटोल येथे तीनखेडा भिष्णुर मार्गाने परत येत असताना काटोल जलालखेडा रोडवरील बेलफाट्याजवळ काही अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गाडीवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करत जीवघेणा हल्ला केला. यात अनिल देशमुख हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचाराचा करिता काटोलच्या रुग्णालयात नेण्यात येत आहे. त्यावेळी कार्यकर्तानी काटोल पोलीस स्टेशन समोर नारेबाजी केली.