येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या सत्तेची चाबी वंचित बहुजन आघाडीच्या हातात- कुशल मेश्राम
1.
काटोलात वंचित बहुजन आघाडीची संघटनात्मक बैठक १९जानेवारी रोजी उत्साहात संपन्न.
जुनी बाजार समितीच्या सभागृहात बैठक घेण्यात आली. वंचित बहुजन चे जिल्हा उपाध्यक्ष तथा न प चे माजी सभापती दिगांबर डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्त्याच्या भरगच्च बैठकीत राज्य सचिव तथा नागपुर जिल्हा निरीक्षक कुशल मेश्राम व पदाधिकारी उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडी काटोल शहर व तालुक्यातील पक्ष कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची संघटनात्मक बैठक पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष दिगांबर डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली शेकडो कार्यकर्त्यान्च्या उपस्थितीत संपन्न झाली यावेळेस प्रमुख मार्गदर्शक राज्याचे सचिव व नागपुर जिल्हा निरीक्षक कुशल मेश्राम जिल्हा अध्यक्ष विलास वाटकर जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद बागडे जिल्हा उपाध्यक्ष सुमेध गोंडाने.महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष विश्रांती रामटेके काटोल तालुका अध्यक्ष देविदास घायवट शहर अध्यक्ष सुधाकर कावळे, महिला आघाडीच्या शहर अध्यक्षा मिना पाटील यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.पक्षाच्या तालुका शहर सर्कल गाव कमिट्याकडुन कुशल मेश्राम व दिगांबर डोंगरे व उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या कार्याचा आढावा घेतला पक्षाची काटोल शहर व तालुक्यातील कार्यकर्त्यानी दिगांबर डोंगरे यांच्या नेत्रूत्वावर व कार्यपध्तीवर खुश होवुन शहरातल्या व तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यानी केला वंचित मध्ये प्रवेश.
यावेळेस पक्षाच्या तालुका व शहर कार्यकारनीत पदभार शोपवन्यात आले,पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या भूमिकेवर व दिगांबर डोंगरे यांच्या नेत्रूत्वावर आनंद व्यक्त करत शेकडो युवकांनी व ज्येष्ठ कार्यकर्त्यानी पक्षात प्रवेश केला यामध्ये.ओंकार मलवे दिपक गुडधे प्रफुल्ल गायकवाड योगेश रेवतकर निर्मला रक्षे अर्चना झिल्पे.प्रधण्या डोंगरे प्रधण्या बांगर सुशीला पन्चभाई जयदेव नागपूरकर मारोती सुकाम विनोद देशभ्रतार सुबोध वाहने सुनिल मून सचिन खडसे अविनाश पारेकर तुषार मरापे रमेश रक्षित प्रदिप पाटील किशोर पांढरे अमन गायकवाड हर्षल सहारे तुकाराम देशभ्रतार, मारोती सुरजुसे,न्यानेश्वर शेंडे,यांनी पक्षात प्रवेश केला.येणारी काटोल नगर परिषदेची.निवडणुक.ताकतीने लढुन वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक निवडून आणण्यासाठी संपुर्ण ताकद लावणार असे मत दिगांबर डोंगरे यांनी मांडले
तर कुशल मेश्राम यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेत्रुत्वात वंचित बहुजन आघाडी धार्मिक मुद्द्यांवर नव्हे तर सर्व सामान्य जनतेच्या हिताचे प्रश्न व मुद्दे घेवुन काम करत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील वंचित घटक पक्षाकडे जुळत असल्यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या सत्तेची चाबी वंचित च्या हाती राहणार असे ते म्हणाले,कार्यक्रमाचे प्रास्ताविक देविदास घायवट यांनी तर संचालन श्रीकांत गौरखेडे तर आभार सुधाकर कावळे यांनी मानले, यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.