गारपीट ग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ नुक्सान भरपाई द्या!काटोल उपविभागीय अधिकारी यांना निवेदन

काटोल: गारपीट ग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे तात्काळ पंचनामे करून 1लाख रु एकरी मदत करा. वंचित बहुजन आघाडीने डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात केले तिव्र व आक्रमक नारे निदर्शने आंदोलन संत्रा मोसंबी पिकांना एकरी 1लाख व चना गहु पिकांना 50हजार रु नुकसान भरपाई जाहीर करा अन्यथा संपुर्ण जिल्हा भर आंदोलन करण्याचा वंचित चे नेते दिगांबर डोंगरे यांचा इशारा

गेल्या दोन दिवसा पूर्वी नागपुर जिल्यात व काटोल तालुक्यातील अनेक गावात वादळी पावसासह जोरदार गारपीट झाल्यामुळे, शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेले संत्रा मोसंबी गहु चना सारख्या महत्वपुर्ण पिकांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे अगोदरच आसमानी व सुल्तानी संकटामुळे हवालदिल झालेला शेतकरी बांधव अतिशय तिव्र चिंतेत सापडलेला आहे,एकिकडे शेतीमालाला भाव नाही, त्यातच नापीकी यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक बजेट बिघडले त्यामुळे परिवाराचे पालनपोषण करणे मुलांचे शिक्षण लग्न कसे करावे, या चिंतेने परेशान असलेला शेतकरी निराशेच्या छायेत गेलेला आहे.

तेव्हा खचलेल्या शेतकऱ्यांना पुन्हां उभे करायचे असल्यास तात्काळ पंचनामे करून.संत्रा मोसंबीला.एकरी 1लाख रु व गहु चना भुइमुंग या पिकाला एकरी 50हजार रु मदत करावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष व न प चे माजी सभापती दिगांबर डोंगरे यांच्या नेत्रुत्वात डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात तिव्र नारे निदर्शने करून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांना उपविभागीय अधिकारी काटोल यांच्या मार्फत शेकडो कार्यकर्त्यान्च्या उपस्थितीत निवेदन सादर करण्यात आले.तेव्हा या निवेदनावर आठ दिवसात अमलबजावणी न झाल्यास संपुर्ण नागपुर जिल्ह्य़ात तिव्र आंदोलन करण्याचा इशारा दिगांबर डोंगरे यांनी दिला आहे.

निवेदन देताना व नारे निदर्शने आंदोलनात जिल्हा उपाध्यक्ष सुमेध गोंडाने विधानसभा अध्यक्ष राजेंद्र सोरते काटोल तालुका अध्यक्ष देविदास घायवट कार्याध्यक्ष श्रीकांत गौरखेडे महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा प्रा. निर्मला रक्षित काटोल शहर अध्यक्ष सुधाकर कावळे महिला आघाडीच्या अध्यक्षा मिना पाटील प्रा. विरेंद्र इंगळे.तालुका उपाध्यक्ष सतीश पाटील, लक्ष्मणराव मेहर ,सुरेश देशभ्रतार, दिगांबर भगत, रीता मेश्राम ,अजय बागडे ,ओंकार मेश्राम, दिपक गुडधे, नामदेवराव बगवे ,गुलाबराव तागडे, बाबाराव गोन्डाने ,रामराव पाटील, गौतमराब फुले ,नीळकंठ गजभिये, मनीष रामटेके ,नामदेव रक्षित, हिरालाल लोखंडे ,प्रकाश निस्वादे यांच्यासह शेकडो शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.