सोनई चैत्र बालाजी ब्रह्म उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न.
सोनईत चैत्र बालाजी ब्रह्म उत्सव मोठ्या उत्साहात साजरा सोनंई येथे चैत्र गुडी पाडव्याच्या निमित्ताने बालाजी तरुण मंडळाच्या वतीने बालाजी चैत्र ब्रह्म उत्सवाचे आयोजित करण्यात आला होता या निमित्ताने प्रवरा संगम येथून कावडीने येथील बालाजी तरुण मंडळाच्या युवकांनी पाणी आणले होते याची गावांतून कावड मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीत डि जे तालावर तरुणाई थिरकत होती आणि तालुक्यांतून गावा गावातुन आलेले घोडे,हे या मिरवणुकीत आकर्षणं ठरले.सनई च्या तालावर ठेका धरत आणि येथील घोडे स्वार यांचा सर्व सोनई करानी आनंद लुटला या मिरवणुकीत देवळाली ता.राहूरी येथील स्वर मधुर सनई चौघडा चा आनंद समस्त सोनई ग्रामस्थ यांनी घेतले. आजचे #महाप्रसाद_चे_आयोजक
#संजय_पाडूरंग_धनवटे,यांचा सन्मान अर्थ व बांधकाम समितीचे सभापती मा. सुनील भाऊ गडाख पाटील यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.त्याच बरोबर 30/11/ 2023 श्री बालाजी महाराज यांची 11 वा वर्धापन दिनाच्या निमित्ताने महाप्रसाद रामदास चिमाजी कुसळकर सर यांचे पंगतिचे आयोजन करण्यात आले आहे.
या मिरवणुकीत वसंत चिमाजी कुसळकर संदिप अशोकराव कुसळकर समवेत सोनई गावाचे विद्यमान सरपंच धनंजय वाघ, मुकेश भाऊ भळगट,संदिप भाऊ अट्टल, पै.संदिप लांडे पाटील ग्रामपंचायत सदस्य सुनिल भाऊ तागड, संतोष काका दरंदले,उपसरपंच प्रसाद हरकळ उद्योजक उमेश भाऊ ऑटी,लखन जगदाळे,सखाराम राशिंनकर,सचिन पवार एकनाथ कुसळकर,आदी मान्यवर या मिरवणुकीत सहभागी झाले होते. बालाजी तरुण मंडळाच्या सर्व तरुण युवकांनी पुढाकार घेऊन विशेषतः सुरेश कुसळकर वायरमन सुरेश लष्कर यांनी मंदिर परिसर अतिशय सुंदर आकर्षित फुलांनी सजावट केली. विजुभाऊ टोकसे यांनी आकर्षित मंदिरावर लाइटिंग की व्यवस्था करून दिली. अशा प्रकारे यात्रेचे आयोजन केले.त्या बद्दल सर्व तरुण मंडळाच्या युवकांचे आभार मानले.
यावेळी बालाजी तरुण मंडळाच्या वतीने जिल्हा परिषदेचे अर्थ व पशुसंवर्धन,बांधकाम समितीचे माजी सभापती सुनिल भाऊ गडाख पाटील यांचा सत्कार करण्यात आला.