राहुरी शहर हद्दीत गाडगे आश्रम समोर अपघात , अपघातांची मालिका सुरूच

राहुरी शहर हद्दीत गाडगे आश्रम समोर अपघात ,  अपघातांची मालिका सुरूच

देसवंडी चा तरुण दुचाकीसह ट्रक खाली गेला. परंतु दैव बलवत्तर म्हणून वाचला जीव.

राहुरी ता पती -

डॉ.दवेंद्र शिंदे

राहुरी तालुक्यातील देसवंडी गावातील तरुण शुभम सुभाष कोकाटे वय 27 वर्षे हा तरुण आपल्या दुचाकीवरून धावडे पेट्रोल पंपाशेजारील लहर पान या दुकानातून नगरमनमाड महामार्गा वरून त्यांच्या दुसऱ्या पान दुकान मालोजी कोरडे पाटील चौक येथे जातं असताना राहुरी येथील खरेदी विक्री संघा समोर दुचाकी ट्रक च्या समोरील च्या चाकाखाली येऊन अपघात झाला या अपघातात शुभम सुभाष कोकाटे तरुणाच्या पायाला किरकोळ दुखापत झाली.

शुभम हा आपल्या ट्रक खाली आला हे समजताच ट्रक ड्राइवर ने ट्रक जागेवर थांबवला आणि त्या तरुणाचा जीव वाचला. अपघात होताच आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी घटना स्थळी धाव घेऊन त्या तरुणाला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आणि ट्रक खालील दुचाकी बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली.त्या तरुणाचे

दैव बलवत्तर होते म्हणुन त्याचा जीव वाचला.

अशा परकारचे अपघात थांबण्यासाठी नगरमनमाड महामार्गाचे काम जळतगतीने व्हायला हवे अशी नागरिकांनी खंत व्यक्त केली.