लोणी खुर्द ग्रामपंचायत च्या कारभाराबद्दल महिला आक्रमक. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन.
लोणी खुर्द ग्रामपंचायत च्या कारभाराबद्दल महिला आक्रमक.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन.
प्रतिनिधी_प्रसाद घोगरे_9370328944.
सविस्तर - अहील्यानगर जिल्ह्यातील लोणी खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील नेहरूनगर व परिसरात अनेक वर्षांपासून काही मुजोर व्यक्तींनी जाणीवूर्वक अतिक्रमण करून रहदारीला अडथळा निर्माण केला आहे, तसेच परिसरात सार्वजनिक ठिकाणी व रहदारीच्या रस्त्यावर अस्वच्छता पसरवणे, गाड्या पार्किंग करणे असे प्रकार काही व्यक्तींकडून जाणीवूर्वक - राजरोसपणे सुरू आहेत, त्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढले आहे, तसेच शालेय विद्यार्थी, वयोवृद्ध व्यक्ती, यांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे, याविरोधात नेहरूनगर येथील जागरूक नागरिकांनी ग्रामसेवक व ग्रामंचायत यांना निवेदन देऊन देखील कोणतेही कार्यवाही करण्यात आली नाही.
लोणी खुर्द ग्रामपंचायत यांचे ग्रामस्थांच्या मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष.
लोणी खुर्द चे ग्रामसेवक व ग्रामंचायत यांना वेळोवेळी तोंडी सांगून व निवेदन देऊन देखील ग्रामपंचायत प्रशासन नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे जाणीवूर्वक दुर्लक्ष करत असल्याने, परिसरातील महिला आक्रमक झाल्या आहेत, त्यामुळे आज 22 मार्च 2025 रोजी महिलांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटून समस्या सगितल्या व त्यांच्या मागण्यांचे निवेदन दिले, तेव्हा पालकमंत्री विखे पाटील यांनी, लवकरात लवकर कायदेशिर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी जयश्री वाकचौरे, कल्पना शिंदे, स्मिता घोगरे, मंदा बनसोडे, तारामती घरात, युवा कार्यकर्ते_स्वप्नील शिंदे, करण बनसोडे, रोहन शिंदे, यश उजागरे, वैभव भोंगळे. उपस्थित होते.