गायरान जमिनीवर घरकुल बांधून अतिक्रमण नियमित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार :- सरपंच भाऊसाहेब सावंत.

*गायरान जमिनीवर घरकुल बांधून अतिक्रमण कायम करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार :- सरपंच भाऊसाहेब सावंत*
नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडी येथे घरकुल लाभधारक व अतिक्रमणधारक यांची सरपंच भाऊसाहेब सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष बैठक घेण्यात आली.
यावेळी चिलेखनवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून या बैठकीला मोठा प्रतिसाद दिला .तर यावेळी सरपंच भाऊसाहेब सावंत बोलताना म्हणाले की ,सध्या चिलेखनवाडी येथे २०० घरकुल मंजूर झालेले असून काहींना पंधरा हजार रुपये( १५००० )पहिला हप्ताही मिळाला आहे .परंतु गायरान जमिनीवर घरकुल बांधण्यासाठी पंचायत समिती स्तरावर स्थगिती देण्यात आली आहे . स्थिगिती उठविण्यासाठी ग्रामस्थांच्या वतीने पंचायत समिती आवारात धरणे आंदोलनही करण्यात आले होते. गटविकास अधिकारी यांनी गावठाण विस्तार करून परवानगी दिली जाईल असे लेखी अश्वासन दिले होते. परंतु १५ दिवस उलटूनही काहीही कार्यवाही झाली नाही .अशी माहिती यावेळी सरपंच यांनी दिली .
तर यावेळी या बैठकीसाठी प्रमुख पाहुणे म्हणून नेवासा तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष शरदराव अरगडे यांनी हा गायरान अतिक्रमणाचा मुद्दा चिलेखनवाडी गावात नसून संपूर्ण तालुक्याचा आहे .मी सरपंच संघटनेच्या वतीने शब्द देतो की ,सर्वसामान्यांच्या हक्कासाठी सर्वसामान्यांना स्वतःच्या हक्काचं घर मिळवून देण्यासाठी वेळप्रसंगी जिल्हा अधिकारी यांना घेराव घालून त्यांना जाब विचारू असे आश्वासित केले.
तर सामाजिक कार्यकर्ते अरुणराव मिसाळ यांनी कायद्याच्या तरतुदीनुसार शासनाच्या जीआर मध्ये गायरान जमिनीवर झोपडपट्टी, घरकुले ज्यांची आहेत. त्यांना ती कायम करण्यात यावी. व अनुसूचित जाती जमातीसाठी ही जागा कायम करण्यात यावी. व या जमिनीवर ग्रामपंचायत चीलेखनवाडी नाव असताना देखील गटविकास अधिकारी यांनी घरकुल बांधण्यास स्थगिती का दिली असा सवाल यावेळी उपस्थित केला. येत्या सोमवारी जिल्हाधिकारी अहिल्यानगर येथे जिल्हाधिकाऱ्यांना शासनाच्या जीआर ची प्रत व लाभार्थ्यांची कागदपत्रे सादर करून निवेदन देऊन हा प्रश्न सोडवणार अशी ग्वाही दिली.
यावेळी उपसरपंच नाथा गुंजाळ , रमेश सावंत , बाळासाहेब दळवी , सूर्यकांत पाडळे , सुशिल कांबळे , सुर नदास कांबळे , अन्सार शेख , शब्बीर इनामदार , सुहास गायकवाड , सुमंत कांबळे , शेषराव भातंबरे , दिपक नरवणे , रवि कांबळे , शेषराव भातंबरे , कैलास गायकवाड , विशाल थोरात , सुनील काळे , अमोल वासेकर , रावसाहेब सावंत , लक्ष्मण वाघमोडे , छबूराव कांबळे , नवनाथ सावंत , दत्तात्रय बनसोडे , संजय गुंजाळ , अक्षय कानडे , नवनाथ गुंजाळ, प्रेस संपादक पत्रकार संघाचे नेवासा तालुका अध्यक्ष युनूस पठाण. आदि चिलेखनवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .
नेवासा तालुका प्रतिनिधी युनूस पठाण.