नेवासा भाजपच्या वतीने तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन
*देशाच्या *पंतप्रधानांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नाना पटोलेंवर फौजदारी गुन्हा दाखल करा.*.
*नेवासा भाजप च्या वतीने तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन*
*कॉंग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष असलेले श्री नाना पटोले यांनी देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेब यांना उद्देशून "मी मोदीला मारील, त्याला शिव्या देईल" असे आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या लोकनियुक्त पंतप्रधानांविषयी असे वक्तव्य करणे निंदनीय आहे, मागे केंद्रीय मंत्री मा. नारायणराव राणे साहेब यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशुन एक विधान केल्यानंतर राज्य सरकारने त्यांच्यावर अटकेची कारवाई केली होती मग आता देशाच्या पंतप्रधानांना मारण्याची भाषा करणाऱ्या नाना पटोलेंवरही फौजदारी खटला दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी नेवासा तालुका भाजपाच्या वतीने करण्यात आली यावेळी मा.आ बाळासाहेब मुरकुटे पाटील माननीय श्री विठ्ठलराव लंघे पाटील जिल्हा उपाध्यक्ष सचिनभाऊ देसरडा जिल्हा संघटन सरचिटणीस श्री नितीन भाऊ दिनकर तालुकाध्यक्ष श्रीभाऊसाहेब फुलारी. युवा मोर्चा तालुका अध्यक्ष श्री प्रताप चिंधे. ओबीसी प्रदेश संपर्क प्रमुख श्री निरंजन भाऊ डहाळे. किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस श्री ज्ञानेश्वर माऊली पेचे. नेवासा शहराध्यक्ष श्री मनोज भाऊ पारखे युवा मोर्चाचे शहराध्यक्ष श्री प्रतीक शेजुळ श्री.आकाश देशमुख .श्री राजेंद्र काका मते . कामगार आघाडी तालुकाध्यक्ष श्री निवृत्ती भाऊ जावळे .ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष श्री बाळासाहेब क्षीरसागर. व्यापारी शहराध्यक्ष श्री सतीश भाऊ गायके सरपंच युवा नेतृत्व श्री स्वप्नीलभाऊ मापारी. तालुका मीडिया संयोजक श्री आदिनाथ पटारे श्री रमेश घोरपडे श्री रावसाहेब होन आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.*