श्रीक्षेत्र खेडले परमानंद च्या वैभवात भर स्वामी परमानंद मठास क 'वर्ग दर्जा प्राप्त
ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण अशा शिवभारतकार कवींद्र परमानंद यांच्या समाधी स्थळ असलेल्या स्वामी परमानंद मठाला क' वर्गाचा दर्जा प्राप्त.
नामदार शंकरराव गडाख, जिल्हा परिषद सभापती अर्थ व बांधकाम सुनील भाऊ गडाख यांच्या विशेष प्रयत्नाने व समस्त गावकऱ्यांच्या सहकार्याने श्रीक्षेत्र खेडले परमानंद तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर या देवस्थानला क वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे.
पुरातत्व विभागाकडून दुर्लक्षित असलेल्या व अतिशय दुरवस्था झालेल्या पडझड झालेल्या मठाच्या विकासासाठी हा निर्णय म्हणजे वैभव पूर्ण असा आहे.
देवस्थानचा विकास झाल्यानंतर या देवस्थानला पर्यटन स्थळाचे रूप मिळेल. त्याचप्रमाणे गावातील अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल. मुळा नदीच्या तीरावर पंधराव्या शतकातील शिवकालीन असलेल्या मठाचा जिर्णोद्धार झाल्यामुळे संपूर्ण परिसराचा विकास होण्याला मदत होईल.
शिर्डी, शनिशिंगणापूर , श्रीक्षेत्रदेवगड अशा पर्यटन स्थळाला भेट देणाऱ्या पर्यटकांची ओढ नक्कीच खेडले परमानंद या ठिकाणी निर्माण होईल.
इतिहासाला सप्रमाण असणाऱ्या शिवभारत ग्रंथाचे लेखक कवींद्र परमानंद यांनी लिहिलेल्या शिवभारत ग्रंथा च्या आधारे १९ फेब्रुवारी ही शिवजन्माची तारीख निश्चित करण्यात आलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर आग्रा भेटीदरम्यान कवींद्र परमानंद हे त्यांच्यासोबत होते. शहाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज या तीन पिढ्यांना जाननारे त्यांच्यात प्रत्यक्ष वावरणारे कवींद्र परमानंद नेवासकर, नेवासे पासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या खेडले परमानंद याठिकाणी त्यांचे समाधी स्थळ आहे.
त्यांच्या समाधीस्थळाचे क वर्ग मध्ये समावेश झाल्यामुळे निश्चितच भावी काळात या ठिकाणाला भव्य दिव्य अशा तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त होईल.
स्वामी परमानंद बाबा मठाचे अध्यक्ष संचालक मंडळ यांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात. किशोर केदारी, सूर्यभान आघाव ,सरपंच राजेंद्र राजळे ,दगडू बाबा हवालदार,प्रल्हाद अंबिलवादे , जावेद इनामदार, नानासाहेब गायकवाड, अशोक शिंदे, काशिनाथ तुवर, रमेश राजळे, अजित इनामदार, नयुम इनामदार ,विजय शिंदे ,समस्त ग्रामस्थ खेडले परमानंद यांच्यावतीने जिल्हा परिषद सभापती सुनील भाऊ गडाख यांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे नामदार शंकरराव गडाख यांचे समस्त ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत आहेत.