छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती कालीचरणजी महाराज व धनंजय भाई देसाई यांच्या उपस्थितीत साजरी.
प्रतिनिधी :-संभाजी शिंदे नगर
मिरी येथील पुरातन कानिफनाथ मंदिर प्रानगणात एक आगळेवेगळे पद्धतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आयोजित करण्यात आली .
छत्रपती शिवाजी महाराज शैक्षणिक व सामाजिक संस्था त्याच प्रमाणे मिरी ग्रामस्थांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये धर्मभूषण पुरस्कार राष्ट्रीय संत बद्रीनाथ महाराज तनपुरे, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान नेवासा येथील शिवाजी महाराज देशमुख, संत चरण छगन महाराज मालुसरे, रायगड शिवचरित्रकार आकाश महाराज भोंडवे, गोरक्षक दीपक महाराज काळे
त्याचप्रमाणे समाजभूषण पुरस्कारासाठी जय हिंद सैनिक फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पालवे, माजी सरपंच अनिल गीते, समाजसेवक आदिनाथ दहिफळे, डॉक्टर संदीप गाडे, डॉक्टर संतोष गीते, डॉक्टर अमोल जाधव, कडू बाळ महाराज गव्हाणे, अक्षय मोहन बोराडे, जयंत लक्ष्मण मोटे, या सर्वांना काली पुत्र कालीचरण महाराज व धनंजय भाई देसाई यांच्या हस्ते शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
यावेळी बोलताना धनंजय भाई देसाई यांनी धार्मिक प्रबोधन करून समाजातील समाजकंटकांना दुष्कृत्य पासून कसे रोखावे यासंबंधीचे मार्गदर्शन केले.
तर महंत काली पुत्र कालीचरण महाराज यांनी शिवतांडव स्तोत्र च्या गायनाने सर्व भाविकांना मंत्रमुग्ध केले.
त्याचप्रमाणे धार्मिक जागृती संदर्भात प्रबोधन केले.
या कार्यक्रमाची सर्व रूपरेषा व नियोजन डॉक्टर नंदकिशोर नरसाळे, शिवचरित्रकार आकाश महाराज भोंडवे यांनी केले.