खेडले परमानंद येथे नदीच्या कडेला शेतात सापडल्या पुरातन ऐतिहासिक मूर्ती शिल्प भैरवनाथ व इतर मुर्त्या.

खेडले परमानंद येथे नदीच्या कडेला शेतात सापडल्या पुरातन ऐतिहासिक मूर्ती शिल्प भैरवनाथ व इतर मुर्त्या.

प्रतिनिधी:- नेवासा

पुरातन ऐतिहासिक वारसा असलेले गाव खेडले परमानंद आणि याच खेडले परमानंद ता. नेवासा जिल्हा अहमदनगर येथे पुरातन वास्तुशिल्प भैरवनाथ व इतर मुर्त्या शेताच्या कडेला सापडल्या आहेत.

       या सापडलेल्या मूर्ती यांच्या कडेला जी घडवलेली दगडे आहेत त्यावरून याठिकाणी पुरातन मंदिर असण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

         शिवभारत ग्रंथाचे लेखक कवींद्र परमानंद यांचे जन्मस्थळ व समाधी स्थळ असलेले नेवासे तालुक्यातील खेडले परमानंद हे ऐतिहासिक दृष्ट्या अतिशय पुरातन असे गाव आहे.

    शिवभारतकार कवींद्र परमानंद यांचा पुरातन मठ इतिहासाची साक्ष देत दिमाखात उभा आहे .त्याचप्रमाणे अनेक मंदिरे नैसर्गिक आपत्तीमुळे नामशेष झालेले आहेत परंतु त्याचे अवशेष आजही या गावांमध्ये सापडलेले दिसून येत आहेत ही मोठी कुतूहलाची गोष्ट आहे.

               या गावांमध्ये अनेक ठिकाणी नवीन घराचे बांधकाम करताना त्याचप्रमाणे नदीकाठच्या परिसरात आजही अनेक प्राचीन शिल्प आढळून येत आहेत. 

              पुरातत्व खाते व इतिहासकारांना चुकीची माहिती दिली गेल्यामुळे खेडले परमानंद गावचा इतिहास हा इतिहासच बनून राहिलेला आहे तो जगासमोर आलेला नाही.

         खेडले परमानंद या गावाला मोठा ऐतिहासिक वारसा होता परंतु मुघल काळात अनेक वेळा झालेल्या आक्रमणांमुळे अनेक मंदिरे पाडली गेली असल्याची शक्यता नाकारता येणार नाही .

          पुरातन असे जगदंबा भवानीचे मंदिर या गावांमध्ये अस्तित्वात आहे. पूर्वी मंदिरापुढे अनेक पुरातन शिल्प व मुर्त्या होत्या परंतु त्या भग्न झाले असे सांगून गावकऱ्यांना त्या गंगेत सोडण्यास भाग पाडण्यात आले. ऐतिहासिक दृष्ट्या अतिशय महत्त्वपूर्ण असणाऱ्या मुर्त्या या गावातून विमुक्त झालेले आहेत.

           पुरातन इतिहासाची साक्ष देणाऱ्या अशा या खेडले परमानंद गावाकडे पुरातत्त्व विभाग शासन यांचे पूर्वीपासूपुरातन इतिहासाची साक्ष देणाऱ्या अशा या खेडले परमानंद गावाकडे पुरातत्त्व विभाग शासन यांचे पूर्वीपासूनच दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.

           आजही संपूर्ण गावाचा चप्पा- चप्पा जर शोध मोहीम घेऊन अभ्यास केला तर काळाला गवसणी घालणारे ऐतिहासिक पुरावे असणारा माहिती पूर्ण इतिहास या परिसरात सापडेल.