*हरी पांडुरंगाच्या पदस्पर्शाने वारकरी सुखावले*

*हरी पांडुरंगाच्या पदस्पर्शाने वारकरी सुखावले*

बी पी एस राष्ट्रीय न्युज सोलापूर

जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे

बार्शी.         अखेर दोन वर्षानंतर वारकरी भक्तांची इच्छा पूर्ण.

कोरोनाच्या महामारी काळात गेली दोन वर्ष विठ्ठलाच्या पदस्पर्शाचे दर्शन बंद होते. नाईलाजाने काही दिवस पांडुरंगाचे मंदिर पण बंद होते पण थोडा करोना कमी झाल्यामुळे मंदिर उघडण्यात आले. मात्र आता पदस्पर्शाचे दर्शन ह्या गुढीपाडव्यापासून सुरू करण्यात आले त्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये उत्साहाचे, आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मंदिर समितीचे अध्यक्ष श्री गहिनीनाथ महाराज औसेकर व इतर व्यवस्थापक यांच्या विनंतीनुसार सरकारला कागदोपत्री निवेदन देण्यात आले होते की गुढीपाडव्यापासून श्रीविठ्ठल यांच्या पदस्पर्शाने चे दर्शन सुरू करण्यात यावे आणि गुढीपाडव्यापासून पदस्पर्श दर्शन सुरू करण्यात आले.

सकाळपासून विठ्ठलाच्या पदस्पर्शाने चे दर्शन घेण्यासाठी रांग लागली होती त्यावेळी वारकरी यांच्यावर पुष्पांचा वर्षाव करून त्यांचे स्वागत करण्यात आले. हरीच्या पदस्पर्शाने चे दर्शन घेण्याची प्रथा असल्यामुळे वारकऱ्यांमध्ये अती उत्साहाचे वातावरण निर्माण झाले व त्यांच्या चेहर्‍यावरील तेज झळकू लागले.

सर्व वारकऱ्यांच्या वतीने मंदिर समितीचे सहअध्यक्ष श्री गहिनीनाथ महाराज औसेकर व त्यांचे साथी, पदाधिकारी तसेच सरकारचे यांचे आभार मानले.