छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला विरोध.. राहुरीत भव्य मोर्चा.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला विरोध.. राहुरीत भव्य मोर्चा.

(राहुरी प्रतिनिधी)- राहुरी पोलिस ठाण्यावर मराठा एकीकरण समिती राहुरी तालुका व टाकळीमियाँ ग्रामस्थ यांच्या वतीने गुरुवार दि.०३ रोजी भव्य मोर्चा काढण्यात आला. मोर्चे करांनी एक मराठा लाख मराठा.... छत्रपती शिवाजी महाराज की जय घोषणांनी पोलिस ठाणे परिसर दणाणून सोडला. 

   बुधवार दि ०२ मार्च रोजी मु.पो टाकळीमिया ता. राहुरी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक बांधण्याच्या व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव टाकळीमिया गावातील वाचनालयास देण्याचा ठराव पारीत करण्यासाठी विशेष ग्रामसभा घेण्यात आली होती. सदर ग्रामसभेत टाकळीमिया गावातील ५०० ते ६०० लोक उपस्थित होते.

सदर ग्रामसभेत सर्वानुमते छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारणे व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नावे वाचनालय तयार करुन सदर वाचनालयाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा ठराव मांडण्यात आला. सदर ठरावाला गावाच्या वतीने एकमताने मंजुरी देण्यात आली सदर ठराव पारीत झाल्यानंतर गावातील स्नेहलता सांगळे ह्या सामाजिक सलोखा बिघडविण्याच्या दृष्टीने आरडाओरड करत विरोध करून राहुरी पोलीस स्टेशन येथे येवुन गावातील प्रतिष्ठित नागरिकांवर भादवी कलम ३५४,३२३,५०४,५०६,१०७ व इतर अशा प्रकारचे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले.

फिर्यादी स्नेहलता सांगळे महिलेचा पती विरोधात अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे अनेक पोलिस ठाण्यात दाखल आहे असे समजते. गावातील शांतता बिघाडुन जाणीव पुर्वक गावातील लोकांना वेठीस धरले जात आहे. पोलिस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.

या प्रसंगी देवळाली प्रवारचे नगराध्यक्ष सत्यजित कदमम्हणाले की अशा प्रवृत्तींना काही राजकीय पक्षांचे नेते पाठीशी घालतात त्यामुळेच या लोकांची हिम्मत वाढत चालली आहे.ज्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका आणि संघटित व्हा असा संदेश दिला त्या बाबासाहेब यांचे नाव घेवून आपल्या स्वत: साठी त्या नावाचा वापर करून चुकीच्या दिशेने संघटन नेत आहेत.ज्यांनी गुन्हे दाखल केले आहेत त्यांच्या पूर्ण कुटुंबाची पार्श्वभूमी त्यांच्यावर यापूर्वी कोणत्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत याची पोलिस प्रशासनाने सखोल चौकशी करण्याचे अवाहन कदम यांनी केले.      

      मराठा एकीकरण समितीचे समन्वयक देवेंद्र लांबे म्हणाले की,समाजाच्या हितासाठी काम करणार्‍या छत्रपतींच्या विचारांनी प्रेरित झालेल्या मावळ्यांकडून महिलांचा अवमान करणे शक्य नाही.छत्रपतींच्या महाराष्ट्रात राहून जर कोणी छत्रपतींच्या स्मारकाला विरोध करत असेल तर सहन केले जाणार नाही. झालेला मोर्चा हा कुठल्याही जाती धर्मा विरोधात नसून समाज विघातक कृत्य करणार्‍या अपप्रवृतींच्या विरोधात आहे.

शेतकरी संघटनेचे प्रकाश देठे म्हणाले की,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा वाघ रविंद्र मोरे यांच्यावर आंदोलन दरम्यान अनेक प्रकारचे गुन्हे दाखल झालेले आहे.जनतेच्या हितासाठी आंदोलन झालेले आम्ही मागे हटलो नाही परंतु महिलेला पुढे करून खोटा गुन्हा दाखल झाला या सारखी दुर्दैवी बाब नाही. त्यामुळे सदर गुन्ह्याचा आम्ही निषेध करतो.

या प्रसंगी दे.प्र.नगराध्यक्ष सत्यजित कदम,मराठा एकीकरण समितीचे देवेंद्र लांबे,दत्तात्रय कवाने,शामकाका निमसे,ज्ञानदेव निमसे,सुरेस निमसे,किशोर जगधने,मछिंद्र गुंड,सुनिता वाडकर,ज्योति निमसे,सिमा तोडमल,योगिता तोडमल,मंगल तोडमल,रोहण भुजाडी,बाळासाहेब सगळगिळे,केशव शिंदे,अनिल इंगळे,प्रताप जाधव,राजेंद्र लबडे,सतीश घुले,राजेंद्र गुंजाळ,योगेश कोहकडे,दिनेश झावरे,सुभाष जुंदरे,हमीद पटेल,विलास गागरे,निखिल कोहकडे,सुरेश करपे,राहुल चोथे,महेश गायकवाड,संदीप विधाटे,नितिन कल्हापुरे आदींसह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.