उंबरे शिवारातील तांबे पेट्रोल पंपा जवळील चोरीचा राहुरी पोलिसांनी लावला छडा, 12 लाख 81 हजार रुपये किंमतीचे लोखंडी स्टील मुद्देमाल चोरणारी टोळी गजाआड .

उंबरे शिवारातील तांबे पेट्रोल पंपा जवळील चोरीचा राहुरी पोलिसांनी लावला छडा, 12 लाख 81 हजार रुपये किंमतीचे लोखंडी स्टील मुद्देमाल चोरणारी टोळी गजाआड .

राहुरी तालुक्यातील उंबरे शिवारातील तांबे पेट्रोल पंपा शेजारी स्टील चोरीची घटना घडली होती .या घटनेविषयी राहुरी पोलीस स्टेशन येथे गु .र . नं . 1156/2022 भादवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.दिवस रात्र पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना व तेथील छुप्या कॅमेर्‍यांना चकमा देऊन ही चोरी करण्यात आली होती .त्यामुळे या चोरीचा उलगडा करणे राहुरी पोलिसांसमोर मोठे आव्हान होते .

 

 

         या धाडसी चोरीचे गांभीर्य लक्षात घेऊन या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर यांनी राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले.वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार वेळ न दवडता पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी एक पथक तयार केले .आरोपींना पकडण्यासाठी या पथकामध्ये पो.स .ई . खोंडे, स .फौ .चंद्रकांत मराठे, पो. हे . कॉ .दिनकर चव्हाण, सोमनाथ जायभाय, पो. ना . अमित राठोड, पो. कॉ .आदिनाथ पाखरे,सचिन ताजने, संतोष राठोड, गणेश लिपने,नदीम शेख,अमोल पडोळे यांचा समावेश करण्यात येऊन घटनेचा तपास जोमाने सुरू करण्यात आला.

 

            सदर चोरीचा तपास करत असताना पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना गुप्त बातमी द्वारा मार्फत आरोपींची माहिती समजली .त्यानुसार सापळा रचून आरोपींना पकडण्याचे नियोजन करण्यात आले .आरोपी राहत असलेल्या उंबरे गावामध्ये संबंधित पथकाने आरोपींना पकडण्याचे काम केले आहे . अभिषेक बाबासाहेब होडे,हर्षल दत्तात्रय ढोकणे,जयेश उर्फ गुलाब बाबासाहेब ढोकणे,छोटू उर्फ सौरभ संजय दुशिंग,राहुल दादू वैरागळ (सर्व राहणार उंबरे ) अशी आरोपींची नावे असून चौकशी दरम्यान गुन्ह्याची कबुली ही त्यांनी दिली आहे .आरोपींना ताब्यात घेऊन चोरलेला मुद्देमाल तसेच या चोरीसाठी वापरण्यात आलेले ट्रॅक्टर व टाटा एस गाडी जप्त करण्यात आली आहे .एकापाठोपाठ सुरू असलेल्या सलग कारवाईने राहुरी तालुक्यातील आरोपीचे धाबे दणाणले आहेत .त्यातच या चोरीचा छडा लावून आरोपींना मुद्देमाला सहित ताब्यात घेतल्याने राहुरी पोलिसांचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे .