विद्यार्थ्यांना दैनंदिन व्यवहाराचे ज्ञान मिळावे यासाठी शिवांकुर विद्यालय कोंढवड येथे बाल आनंद मेळाव्याचे आयोजन ,उत्साहपूर्ण वातावरणात बाल आनंद मेळावा संपन्न .
राहुरी तालुक्यात निसर्गरम्य वातावरणात असलेल्या शिवांकुर विद्यालय कोंढवड येथे बाल आनंद मेळावा निमित्ताने चित्रकला, कार्यानुभव व विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन बुधवार दिनांक 21 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 9 ते 12 या वेळेत संस्थेचे सचिव डॉक्टर प्रकाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते .
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पवार, उपाध्यक्ष गणेश शेळके, विश्वस्त उत्तमराव पवार व ज्योतिताई शेळके, खजिनदार डॉक्टर किशोर पवार हे उपस्थित होते .
शाळेतिल विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचा भाजीपाला, मिठाई, शालेय साहित्यासह अनेक वस्तू विक्रिसाठी आनंद बाजारात आणल्या होत्या. दैनदिन व्यवहाराचे ज्ञान मुलांना देण्यासाठी शिवांकुर विद्यालयाने केलेला हा उपक्रम अतिशय सुंदर असल्याचे पालकाकडून बोलले जात होते .तसेच या उपक्रमासाठी शिवांकुर विद्यालयाचे कौतुकही होत होते. स्वतः जवळच्या वस्तू विकून मिळालेल्या पैशाने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद झळकत होता .
या कार्यक्रमासाठी शिवांकुर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका छाया जाधव, अरुण खिलारी, किरण तारडे, सविता गव्हाणे, प्रिया जाधव, सुजाता तारडे, रोहिणी खडके, विजय शिंदे, सचिन जाधव, प्रियंका पांढरे, सुवर्ण थोरात, शितल फाटक, अनिता लांबे,शारदा कोकाटे, तनुजा झुगे, मयूर धुमाळ, बर्डे सर, करपे सर, झावरे सर, लिपिक कोळेकर सर, तमनर, मासे, धावटे या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले आहे .तसेच या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित असल्याने या बाल आनंद मेळाव्याची चर्चा व कौतुक तालुक्यामध्ये सर्वत्र होताना दिसत आहे .