दलितांवरील वाढत्या अत्याचाराचे प्रमाण समाजातील दरी वाढवणारे असून त्या विरोधात तात्काळ आवाज उठवणे आवश्यक आहे

अहमदनगर : *दलितांवरील वाढत्या अत्याचाराचे प्रमाण समाजातील दरी वाढवणारे असून त्या विरोधात तात्काळ आवाज उठवणे आवश्यक आहे,यासाठी राष्ट्रीय दलित अधिकार आंदोलन सुरू करण्यात आलेले असुन माणसाने माणसाचे शोषण करू नये यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे,* असे मत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सह सचिव कॉ. प्रा. राम बाहेती यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय दलित अधिकार आंदोलनाचे अहमदनगर जिल्हा अधिवेशन नुकतेच किसान भवन येथे रत्नाकर मगर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. त्यावेळीं ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉ.ॲड. सुभाष लांडे पाटील,इन्युसभाई तांबटकर , संध्याताई मेढे, भाकपचे जिल्हा सेक्रेटरी कॉ. बन्सी सातपुते इत्यादी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना कॉ. राम बाहेती म्हणाले की, 'काळाच्या ओघात गरिबी वाढत गेली,समाजवादाची प्रस्तापना करताना जात हा फॅक्टर येतो,तो नष्ट करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, त्यासाठीच राष्ट्रीय दलित अधिकार आंदोलन कार्यरत राहणार आहे' इन्युसभाई तांबटकर यावेळी बोलताना म्हणाले की, समाज बदला साठीचा मार्ग शोधून योग्य त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न समविचारी लोकांना सोबत घेऊन करणे आवश्यक आहे, त्यासाठी कॉमन सामाजिक प्रोग्राम राबवणे आवश्यक आहे. समाजातील उदासीनता दूर करणे आवश्यक आहे. कॉ. सुभाष लांडे पाटील बोलताना म्हणाले की, अंधारून आलेले असताना उजेडाचा शोध घेणे आवश्यक असून सध्याच्या सामाजिक परिस्थितीमध्ये महत्त्वाच्या प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी काही विघ्नसंतोषी विनाकारण समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करत आहे हे चुकीचे आहे. याला पायबंद घालने आवश्यक आहे. यावेळी संध्याताई मेढे, ॲड. अमोलिक, कॉ. ॲड. बन्सी सातपुते यांनी मनोगत व्यक्त केले. कॉ. संजय नांगरे यांनी प्रास्ताविक करून सूत्रसंचालन केले.भारतीय महिला फेडरेशनच्या राज्य अध्यक्षा प्रा. स्मिता पानसरे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शहर सेक्रेटरी भैरवनाथ वाकळे, कॉ. भगवान गायकवाड, कॉ. हरिभाऊ नजन,शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सुनील गोसावी, कॉ.रामदास वाघस्कर, सुभाष चव्हाण, शेखर तिजोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.शेवटी फिरोज शेख यांनी आभार मानले. यावेळी राष्ट्रीय दलित अधिकार आंदोलनाची अहमदनगर जिल्हा कार्यकारणीपुढील प्रमाणे निवडण्यात आली. जिल्हाध्यक्ष- प्रा.एल.बी. जाधव, सेक्रेटरी- नंदकुमार उमाप, उपाध्यक्ष- ॲड.जी.बी.अमोलीक, सह सेक्रेटरी- ॲड संजय वाकचौरे, कार्यकारणी सदस्य -ॲड बन्सी सातपुते, रत्नाकर मगर,आनंद चव्हाण, सुधाकर निळे यांची निवड करण्यात आली ---- रिपोर्टर-- निकाळे प्रकाश बी पी एस लाईव्ह न्यूज.

दलितांवरील वाढत्या अत्याचाराचे प्रमाण समाजातील दरी वाढवणारे असून त्या विरोधात तात्काळ आवाज उठवणे आवश्यक आहे