राहुरी येथे एका गावामध्ये विवाहितेवर रात्रभर बलात्कार केल्याची घटना घडली

राहुरी येथे एका गावामध्ये विवाहितेवर रात्रभर बलात्कार केल्याची घटना घडली

राहुरी प्रतिनिधी,  

डॉ देवेंद्र शिंदे 

३० वर्षीय विवाहित तरुणी रात्रीच्या दरम्यान घरात एकटीच असल्याची संधी साधून आरोपी दिपक आघाव हा जबरदस्तीने घरात घुसला. आणि त्याने तरुणीला शिवीगाळ व मारहाण करत रात्रभर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. पोलिस पथकाने आरोपीला तात्काळ ताब्यात घेऊन गजाआड केले. 

         या घटनेतील ३० वर्षीय विवाहित तरुणीचे पती काल दि. २४ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्रपाळीच्या कामाला गेले होते. त्यावेळी रात्री १०.३० वाजे दरम्यान विवाहित तरुणी घरात एकटीच असल्याची संधी साधून आरोपी दिपक आघाव याने तरुणीच्या घराचे दार वाजवले. तरुणीने दार उघडताच आरोपीने तीचे तोंड दाबून घरात नेले. त्यानंतर रात्रभर तीच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. तसेच तू जर कोणाला काही सांगीतले तर मोबाईलवर काढलेले फोटो व्हायरल करेल आणि तूझ्या पतीला भर रस्त्यावर जीवंत मारीन अशी धमकी दिली. आज सकाळी सदर पिडीत तरुणीने आपल्या नातेवाईकांसह राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगीतला. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक राजू जाधव, पोलिस नाईक प्रमोद ढाकणे, चाँदभाई पठाण मेजर, नदिम शेख, सचिन ताजने, इफ्तेखार सय्यद, चालक संदिप रोकडे आदि पोलिस पथकाने ताबडतोब आरोपीचा शोध घेऊन त्याला गजाआड केले. 

        पिडीत तरुणीने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार आरोपी दिपक भानुदास आघाव, रा. बारागाव नांदुर याच्यावर गुन्हा रजि. नं. ११५४/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ६४, ३३३, ११५ (२), ३५२, ३५१ (२) प्रमाणे मारहाण, धमकी व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढिल तपास पोलिस उप निरीक्षक राजू जाधव हे करीत आहे.