श्रीराम विद्यालय ढोरजळगाव येथे राहुल फसले यांचा सन्मान.

श्रीराम विद्यालय ढोरजळगाव येथे राहुल फसले यांचा सन्मान.

श्रीराम विद्यालय ढोरजळगाव येथे राहुल फसले यांचा सन्मान

 

भारत भालेराव

ग्रामीण प्रतिनिधी,

 

आव्हाणे बु: कर्मयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूह शेवगावचे श्रीराम माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय ढोरजळगाव येथे विद्यालयाचे सन २००९ चे माजी विद्यार्थी चि.राहुल बाळासाहेब फसले यांचा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ऑगस्ट 2022 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत मंत्रालयीन कक्ष अधिकारी वर्ग 2 पदी निवड झाल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना श्रीराम विद्यालयाच्या मातीत जादू आहे यामुळेच विद्यालयातील अनेक विद्यार्थी स्पर्धा-परीक्षांच्या माध्यमातून यश मिळवून अधिकारी पदावर कार्यरत आहेत आपण निश्चित ध्येय ठेऊन अभ्यास केल्यास आणि ध्येय निश्चित केल्यास यश हमखास मिळते असे मत मांडले.

विद्यालयाचे प्राचार्य श्री संजय चेमटे यांनी राहुल फसले यांच्या निवडीबद्दल अभिनंदन करून यापुढेही असे अधिकारी घडावेत व त्यासाठी शाळा कायम प्रयत्न करेल असे मत व्यक्त करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य संजय चेमटे,पर्यवेक्षक सुनील जायभाये,श्री.बाळासाहेब फसले,पत्रकार ज्ञानेश्वर फसले, शिवाजी लांडे,संभाजी लांडे,,भाऊसाहेब लांडे,दिनकर फसले,रामेश्वर केसभट, अप्पासाहेब जाधव,विजय पाटेकर यांचेसह गावातील ग्रामस्थ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ईश्वर वाबळे यांनी केले व सुधाकर आल्हाट यांनी आभा

र मानले.