आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल देडगाव ग्रामस्थांच्या वतीने नागरी सन्मान.

आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल देडगाव ग्रामस्थांच्या वतीने नागरी सन्मान.

आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल सागर बनसोडे सर यांचा नागरी सन्मान.

   नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील अहिल्यादेवी होळकर बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे संस्थापक,तथा चाईल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष सोसायटीचे चेअरमन सागर बनसोडे सर यांना महाराष्ट्र इंग्रजी शाळा चालवणाऱ्या संस्था चालकाची एकमेव संघटना असलेली महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोशियन या इंग्रजी शाळा संस्था चालक संघटनेचे 11 वे राज्यस्तरीय अधिवेशन आत्मा मलिक शैक्षणिक संकुल ध्यानपीठ कोकमठाण शिर्डी जिल्हा अहिल्यानगर येथे 31 जानेवारी 2026 रोजी झालेल्या कार्यक्रमात कामाची दखल घेत आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला होता. 

तसेच प्रो. डॉ.विजय कदम सर यांनाही पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रतिनिधी विठ्ठल कदम सर यांचा सन्मान करण्यात आला.

      त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने सागर बनसोडे सर यांचा नागरी सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमास मुळा एज्युकेशन संस्थेचे सदस्य बाजीराव पाटील मुंगसे अध्यक्षस्थानी लाभले.तर गणपती देवस्थानचे विश्वस्त अशोक मुंगसे, आमदार विठ्ठलराव यांचे समर्थक मच्छिंद्र मुंगसे,सरपंच चंद्रकांत मुंगसे यांनी आपली मनोगत करत सागर बनसोडे सरांना शुभेच्छा दिल्या.

     यावेळी सागर बनसोडे सत्कारला उत्तर देत गावचा सन्मान हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान असून मी कायम ऋणी राहील व माझी या संस्थेने दखल घेतल्याबद्दल संस्थेचे ही आभार व ग्रामस्थांचे प्रेम असेच राहू द्या म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या.

    याप्रसंगी चेअरमन भानदास पाटील मुंगसे, उपसरपंच बाळासाहेब मुंगसे ग्रा.सदस्य कानिफनाथ गोयकर, अंबादास तांबे, बालाजी देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ महाराज मुंगसे विश्वस्त रामभाऊ कुटे, उद्धव मुंगसे कचरू तांबे, दत्ता पाटील मुंगसे,किशोर वांढेकर, व्हाईस चेअरमन जनार्धन देशमुख, सचिन मुंगसे, मा.चेअरमन महेश कदम, विश्वास हिवाळे,सुभाष मुंगसे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार युनूस पठाण यांनी केले तर आभार तक्षशिला इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य विठ्ठल कदम सर यांनी मानले.