दशक्रिया विधी निमित्त तमनरआखाडा येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न, शिवसेनेचे युवा नेते राजूभाऊ शेटे पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले
तमनर आखाडा येथे कै सौ मिराबाई माणिक तमनर यांच्या स्मनार्थ दशक्रिया विधीनिमित्त वृक्षरोपणाचा कार्यक्रम करण्यात आला
राहुरी ता प्रती डॉ देवेंद्र शिंदे
या कार्यक्रमाला राहुरी तालुका शिवसेनाप्रमुख युवा नेते राजूभाऊ शेटे पाटील उपस्थित , समवेत जुंधारे साहेब होते आणि यांच्या मार्गदर्शनाखाली दशक्रिया विधी निमित्त
शिवसेनेचे युवा नेते श्री राजुभाऊ शेटे पाटील यांच्या हस्ते वृक्षरोपणाला सुरुवात करण्यात आली आणि राजाभाऊ शेटे मित्र मंडळाच्या वतीने कै सौ मिराबाई माणिक तमनर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच गावातील इतर मान्यवर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले
यावेळी श्री राजुभाऊ शेटे पाटील यांनी सांगितले की प्रत्येक कार्यक्रमा अंतर्गत आपण , आपल्या मुलांना ,समाजाला वृक्षारोपण करण्याचा एक तरी झाड लावायचे आहे हा संकल्प संदेश दिला तसेच तमनर परिवाराचे सांत्वन केले









