श्रीरामपूर तालुका केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन, श्रीरामपूरची वार्षिक सर्वसाधारण सभा स्वयंवर मंगल कार्यालय येथे अध्यक्ष श्री जालिंदर भवर यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात दोन सत्रात संपन्न झाली. कै. ओमप्रकाशजी गुलाटी यांच्या स्मृती प्रित्यर्थ गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.
श्रीरामपूर (प्रतिनिधी) श्रीरामपूर तालुका केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन, श्रीरामपूरची वार्षिक सर्वसाधारण सभा स्वयंवर मंगल कार्यालय येथे अध्यक्ष श्री जालिंदर भवर यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात दोन सत्रात संपन्न झाली.
दुसऱ्या सत्रात सहा.आयुक्त अन्न व औषध प्रशासन श्री हेमंत मेतकर औषध निरीक्षक श्री माधव निमसे औषधे निरीक्षक श्री ज्ञानेश्वर दरंदले यांचे मार्गदर्शन होवून कै. ओमप्रकाशजी गुलाटी यांच्या स्मृती प्रित्यर्थ गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.
यावेळी अखिल भारतीय केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य श्री अजित पारख, केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्टचे जिल्हा अध्यक्ष श्री दत्ता गाडळकर, सेंट्रल झोन महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष श्री शशांक रासकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य तसेच कै. ओमप्रकाजी गुलाटी ट्रस्टचे अध्यक्ष रविंद्र गुलाटी जिल्हा कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब ढेरंगे यावेळी प्रमुख म्हणून उपस्थित होते.
या वार्षिक सभेमध्ये 2024-25वर्षासाठी नूतन कार्यकारणी निवड करण्यात आली त्यामध्ये नूतन अध्यक्ष श्री सुजित राऊत सचिव श्री आनंद कोठारी तर खजिनदार पदी श्री कोविल खेमनर यांची निवड करण्यात आली
यावेळी अध्यक्ष जालिंदर भवर, सुजित राऊत, आनंद कोठारी, रविंद्र चौधरी, ओम नारंग कोविल खेमनर, उदय बधे, माधव आसने, प्रदिप डावखर, संदिप टुपके, प्रशांत उचित, दिपक उघडे, कैलास चायल अशपाक शेख, रियाज पोपटीया, प्रशांत कोठारी शशिकांत गौड यांनी परिश्रम घेतले.
केमिस्ट बंधूंचे सर्व अडीअडचणी सोडवण्याचे व सर्वांना सोबत घेऊन जाण्याचे आश्वासन नूतन अध्यक्ष श्री सुजित राऊत यांनी यावेळी सांगितले
कार्यक्रमाची प्रास्तावना शशांक रासकर यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन संतोष मते वओम शेठ नारंग आभार प्रदर्शन कोविल खेमनर यांनी केले.
यावेळी अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन होऊन श्रीरामपूर जिल्हा करण्याचा ठराव रवींद्र गुलाटी यांनी मांडला
त्यास शशांक रासकर यांनी अनुमोदन देत एकमताने ठराव मंजूर करत शासनापर्यंत ठराव पाठवण्यात आला